Optical Illusion : सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजन हा बौद्धिक क्षमता जाणून घेणारा खेळ आहे. अनेकांना ऑप्टिकल इल्युजन सोडविणे आवडते; पण काही इल्युजन्स सोडवणे अवघड जाते. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये काही अंक लपलेले आहेत. अगदी सोपी वाटणारे हे इल्युजन प्रत्यक्षात मात्र तितकेसे सोपे
नाही.

व्हायरल ऑप्टिकल इल्युजन

या व्हायरल ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये काही अंक लपलेले आहेत आणि हे अंक शोधायचे आहेत. रेडिटवर hybridqueen95 या अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘तुम्हाला काय दिसते?’ सध्या हा फोटो चांगलाच चर्चेत आहे.
या फोटोचे निरीक्षण केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला ‘45283’ हा अंक दिसेल; पण हे खरं उत्तर नाही. मग खरं उत्तर काय आहे? फोटोमध्ये कोणते अंक लपलेले आहेत? जाणून घेऊ या ….

What do you see ?
byu/hybridqueen95 inopticalillusions

हेही वाचा : हृदयस्पर्शी! बहिणीच्या खांद्यावर डोके ठेवून भाऊ ढसाढसा रडला, लग्नातील हळदीच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल

युजर्सच्या प्रतिक्रिया

अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही युजर्सनी 45283 हे अंक लपलेले असल्याचे सांगितले. काही युजर्सनी ‘8452839’; तर काही युजर्सनी 3452839 हे अंक लपलेले असल्याचे सांगितले आहे.

काय आहे खरं उत्तर?

फोटोमध्ये ‘45283’ हे अंक स्पष्ट दिसत आहे; पण या अंकांपुढील सुरुवातीचा एक आणि शेवटचा एक अंक स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे लपलेले अंक कोणते आहेत? असा संभ्रम निर्माण होतो. सुरुवातीचा अंक ‘8’ आहे की ‘3’ आणि शेवटचा अंक ‘9’ आहे का, हे स्पष्टपणे समजून येत नाही. त्यामुळे हे ऑप्टिकल इल्युजन सोडवणे खूप अवघड आहे.

Story img Loader