Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही इल्यूजन खूप अचंबित करणारे असतात. सध्या असाच एक इल्यूजनचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अर्धे डोळे बंद केल्यानंतर कोणीतरी दिसते असं सांगितले आहे, आपल्याला कोण दिसतं, हे ओळखायचं. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमध्ये तुम्हाला एक मोठी इमारत दिसेल. आणि दोन्ही बाजूला दुकाने दिसतील. मध्ये काही लोकं ये-जा करताना सुद्धा दिसतील पण तुम्हाला या फोटोमध्ये आणखी कोणी दिसतंय का? या फोटोमध्ये एक चेहरा लपल्याचा दावा केला आहे. फोटोवर कॅप्शन लिहिलेय, “अर्धे डोळे बंद करा आणि सांगा कोण दिसते ते. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये सुरुवातीला तुम्हाला कोणताही चेहरा दिसणार नाही पण जेव्हा अर्धे डोळे बंद करुन पाहाल तेव्हा तुम्हाला एक कलाकृती दिसेल. ही कलाकृती श्री स्वामी समर्थ यांची आहे. ही कलाकृती पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखले जातात. देशभरातून अनेक लोक स्वामी समर्थ यांची पूजा करतात आणि त्यांना मानतात. अनेक लोकांची स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे.
हेही वाचा : VIDEO : शेतकऱ्याची पोर! वडील देताहेत चिमुकलीला शेत नांगरण्याची ट्रेनिंग, पाहा व्हायरल व्हिडीओ
shree_aanantkoti_bhramhandnayk या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक युजर्सनी या व्हिडीओमध्ये त्यांना श्री स्वामी समर्थ दिसल्याचे सांगितले आहेत.