Optical Illusions : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. काही ऑप्टिकल इल्यूजन खूप सोपी असतात तर काही इल्यूजन खूप कठीण असतात पण अनेक लोकांना कठीण इल्यूजन सोडवायला खूप आवडते. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोन कुत्रे आणि एक माणूस दिसत आहे.पण हा माणूस नसून तिसरा कुत्रा असल्याचा दावा केला जात आहे. तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन
या व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनमध्ये तुम्हाला सुरुवातीला दोन कुत्रे दिसत आहे आणि एक माणूस काळ्या रंगाचे कपडे परिधान करून उभा असलेला दिसत आहे. फोटो अगदी स्पष्ट आहे मग हा माणूस नसून कुत्रा आहे, असे म्हणणे आपल्याला चुकीचे वाटू शकते पण नीट पाहा खरंच हा माणूस नाही? फोटोमध्ये खरंच तिसरा कुत्रा आहे का?
ऑप्टिकल इल्यूजनचे उत्तर
फोटो सुरुवातीला पाहिल्यानंतर तुम्हाल दिसेल की फोटोमध्ये एक माणूस आणि दोन कुत्रे आहेत.पण माणूस हा कुत्रा असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा फोटो आपण नीट पाहावा. अनेकांना तरीसुद्धा फोटोमध्ये एक माणूस आणि दोन कुत्रे दिसतील. जेव्हा तुम्ही हा फोटो खूप जवळून पाहाल तेव्हा कदाचित तुम्हाला माणसाच्या ऐवजी कुत्रा दिसू शकतो त्यासाठी तुम्हाला फोटो नीट खूप जवळून पाहावा लागेल. संभ्रमित करणारा हा फोटो अनेकांना थक्क करू शकतो.
हेही वाचा : याला म्हणतात संस्कार! चालताना हात पकडून चिमुकला देतोय आजोबांना आधार, व्हिडीओ होतोय व्हायरल
Massimo या एक्स अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पाहा हे ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या बुद्धीशी कसा खेळतो. सुरुवातीला तुम्हाला दोन कुत्रे आणि त्याचा मालक दिसले पण नंतर…” या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला अजुनही दोन कुत्रे आणि मालक दिसतोय” तर एका युजरने लिहिलेय, “हे ऑप्टिकल इल्यूजन खूप कठीण आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी माणसाचा फोटो खूप जवळून पाहिला, तेव्हा कुठे मला कुत्रा दिसला”