Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके क्रिएटिव्ह असतात की पाहून थक्क होतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रंगबेरंगी ओढण्या दिसत आहे पण तुम्हाला माहिती आहे या व्हिडीओमध्ये विठ्ठल लपलेला आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे पण हे खरंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एका दुकानात रंगबेरंगी ओढण्या लटकवलेल्या आहेत. या ओढण्या खूप सुंदर दिसत आहे पण तुम्हाला या व्हिडीओमध्ये विठ्ठल दिसतोय का? खरंच या व्हिडीओमध्ये विठ्ठल लपलेला आहे का?
खरंच या व्हिडीओमध्ये विठ्ठल लपलेला आहे का?
सुरुवातीला तुम्हाला या व्हिडीओमध्ये सुंदर ओढण्या दिसतील पण जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ नीट पाहाल तर कदाचित तुम्हाला विठ्ठलाची प्रतिमा दिसू शकते. या साठी तुम्हाला तुमचा एक डोळा बंद करुन या व्हिडीओकडे नीट पाहावे लागेल. तुम्हाला विठ्ठलाची आकृती दिसू शकते.
warichya_vatevar या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भगवंत दर्शन ….”
या व्हिडीओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “विठ्ठलाची कृपा” तर एका युजरने लिहिलेय, “जय हरी विठ्ठल”