Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या फोटोमध्ये एक मगर लपली आहे. जी तुम्हाला शोधायची आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमध्ये लपले आहेत एकूण ११ वाघ; तुम्हाला किती दिसले? यावरून ठरेल तुमचे व्यक्तिमत्व)

लपलेली मगर शोधणे सोपे नाही

या फोटोमध्ये एक तलाव दिसत आहे. तलावाच्या आजूबाजूला झाडे देखील दिसत आहेत. या सर्वांमध्ये एक धोकादायक मगर लपलेली आहे. जी तुम्हाला शोधायची आहे. खर तर ही मगर शोधणे इतके सोपे नाही कारण कलाकाराने ही मगर लपवताना अशाप्रकारे लपवली आहे की जवळजवळ शोधणे कठीण आहे. मगरीला शोधण्यासाठी तुमचे मन एकाग्र आणि डोळे तीक्ष्ण असण्याची गरज आहे. जर तुम्ही ही मगर शोधू शकलात तर तुम्ही बुद्धिमान ठराल.

येथे लपलीये मगर

तुम्हाला जर ही मगर दिसली असेल तर तुमचे अभिनंदन. तुम्ही बुद्धिमान व्यक्तींच्या यादीत सामील झाला आहात. ज्यांना ही मगर दिसली नाही त्यांना चिंता करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला याचे योग्य उत्तर सांगणार आहोत, हे चित्र नीट पारखून पाहा, तलावात असलेल्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला मगर दिसेल. तलावात एक झाडाचे मुळ दिसत आहे. त्याच्या जवळच मगरीचे तोंड दिसत आहे. तुम्हाला जर मगर दिसली असेल तर हे कोडे तुमच्या मित्र- मैत्रिणींना देखील पाठवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion find the crocodile in the picture also read the result gps