Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या चित्रात सूर्य मावळताना दिसत आहे. मावळणाऱ्या या सूर्यामध्ये एक जिराफ देखील लपला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

( हे ही वाचा: जंगलात अचानक धावताना दिसली डायनासोरची पिल्ले? व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल)

फक्त १% लोक जिराफ शोधू शकले

या चित्रामध्ये झाडे दिसत आहेत आणि त्याच्या बाजूला ढगांनी देखील गर्दी केली आहे. सूर्य मावळतोय म्हणजेच आता सूर्यास्त होणार आहे. मात्र या चित्राची गंमत म्हणजे या चित्रामध्ये जिराफ अजिबात दिसत नाही. अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काहीचजण याचे योग्य उत्तर देऊ शकले आहेत. तुम्ही देखील या चित्रातील जिराफ शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नीट लक्ष देऊन हे चित्र पाहिल्यास तुम्हाला जिराफ नक्की दिसेल.

येथे आहे जिराफ

खरं तर, या चित्रात हा जिराफ एका झाडाजवळ उभा आहे आणि फक्त त्याची मान दिसत आहे. जर तुम्ही नीट पाहिले तर मध्यभागी झाड आणि सूर्य यांच्यामध्ये दिसणारी आकृती जिराफ आहे. चित्रासोबत जिराफ अशा प्रकारे सेट केला होता की तो दिसत नाही पण काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर जिराफ कुठे आहे हे कळते.

Story img Loader