Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.
उत्तर १० सेकंदात द्यायचे आहे

या फोटोमध्ये तुम्हाला एक रेस्टॉरंट दिसत असेल, ज्याच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह दिसतो आहे. त्या महिलेच्या खूनीचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे. या फोटोमध्ये योग्य उत्तर शोधण्यापूर्वी, आपल्या मोबाइल फोनमध्ये १० सेकंदांचा टायमर सेट करण्यास विसरू नका. या फोटोकडे बारकाईने पाहिल्यास, उत्तर मिळण्याची शक्यता वाढू शकते.
( हे ही वाचा: Optical Illusion: चित्रात लपलेली दुसरी मांजर तुम्ही शोधू शकता का? फक्त १% लोक देऊ शकले योग्य उत्तर)
‘हा’ आहे महिलेचा खुनी
जर तुम्हाला योग्य उत्तर मिळाले नाही तर आम्ही तुम्हाला काही हिंट देतो. या पाच संशयितांपैकी एकाचा चेहऱ्यावर बारा वाजले आहेत. याशिवाय मृत महिलेच्या हातात कोणाच्यातरी शर्टचे फाटलेले कापडही दिसत आहे. जर तुम्हाला अजूनही खुनी सापडत नसेल, तर खालील फोटोमध्ये त्या महिलेचा खूनी पहा.

( हे ही वाचा: Optical Illusion: चित्रात लपलेली हिऱ्याची अंगठी तुम्ही शोधू शकता का? ९९% लोकं ठरलीत अपयशी)
काहीचं लोक कोडे सोडवू शकले
पुरुष क्रमांक ४ हा महिलेचा खून करणारा आहे कारण त्याच्या मानेवर खुणा आहे, तो शौचालयाच्या सर्वात जवळ आहे, त्याचा चाकू देखील गायब आहे आणि त्याच्या शर्टचा काही भाग महिलेच्या हातात राहिला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिलेल्या वेळेत हे कोडे सोडवणारे खूप कमी लोक आहेत. असे ऑप्टिकल भ्रम अनेकदा सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतात.