सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही महत्वाचा संदेश देणाऱ्या अशा गोष्टींचा यात समावेश असतो. यातीलच एक रंजक प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन हा आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच एक ऑप्टिकल इल्युजनचे एक चित्र व्हायरल होत आहे. काय आहे यामधलं चॅलेंज जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रामध्ये दोन महिला दिसत आहेत. तसेच त्यातील एका महिलेच्या मागे एक कुत्रा उभा असलेला दिसत आहे. पण या चित्रामध्ये आणखी एक कुत्रा आहे तो कुत्रा कुठे आहे ते शोधण्याचे चॅलेंज आहे. चित्र पाहून तुम्हाला ओळखता येत आहे का पाहा.

Viral Video : त्याने चक्क सिंहीणीला घाबरवण्याचे धाडस केले, पुढे काय झाले एकदा पाहाच

फोटो :

हे चित्र फक्त वरवर पाहिले तर त्यामध्ये दुसरा कुत्रा दिसणार नाही, पण जर नीट निरखून पाहिले तर गुलाबी ड्रेस घातलेल्या महिलेच्या उजव्या हातावर तुम्हाला दुसरा कुत्रा दिसेल. हा फोटो पाहुन तुम्हाला लक्षात येईल.

तुम्ही हे चित्र तुमच्या मित्रांना दाखवून त्यांनादेखील ७ सेकंदात दुसरा कुत्रा कुठे आहे हे शोधण्याचे चॅलेंज देऊ शकता.