ऑप्टिकल इल्युजन असणारे फोटो हुशार व्यक्तीलाही गोंधळात टाकू शकतात. मात्र, या फोटोमध्ये काय दडलंय, हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. सहजासहजी न दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला या फोटोमधून शोधून काढायच्या असतात. ऑप्टिकल इल्युजन मानवी मेंदूला आव्हान देतात. प्रत्येक चित्रात एक प्रकारचा भ्रम दिसतो. असे भ्रमदेखील मनोविश्लेषणाचा एक भाग आहेत.
असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक कुटुंब एका खोलीत बसले आहे. मात्र, आता या फोटोमधून आपल्याला लपलेल्या दोन मांजरी शोधून दाखवायच्या आहेत. असे सांगण्यात आले आहे की ज्या लोकांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण आहे असे लोकच या फोटोमधील कोडे सोडवण्यात यशस्वी ठरू शकतात. या फोटोमध्ये देण्यात आलेले कोडे २० सेकंदांमध्ये सोडवण्यात केवळ १% माणसे यशस्वी ठरू शकतात. तुम्ही या १% माणसांपैकी आहात का?
या फोटोमध्ये एक माणूस सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत आहे. त्यांची पत्नी त्यांच्या समोर खुर्चीवर बसली आहे आणि त्यांची मुलगी जमिनीवर खेळत आहे. असा दावा करण्यात आला आहे की खोलीत लपलेल्या दोन मांजरी फक्त १% लोक शोधू शकतात.
हे ऑप्टिकल इल्युजन हेक्टिक निक नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये लपलेल्या मांजरींना शोधणे फार कठीण आहे कारण ते खोलीच्या पार्श्वभूमीवर लपलेले आहेत. खोलीत पती, पत्नी आणि त्यांची मुलगी पाहणे सोपे असले तरी, लपलेली मांजर शोधण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेळ लागू शकतो. तुम्हाला हा फोटो काळजीपूर्वक पाहायचा आहे.
Photos : तुमच्या ओळखपत्रावर कोणी दुसरी व्यक्ती तर Sim Card वापरत नाही ना? असं करा ब्लॉक
माणसाच्या पायाखालची पहिली मांजर दिसेल. तर दुसरी मांजर महिलेच्या मांडीवर दिसू शकते.