Optical Illusion Picture: ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ज्यामधील गोष्टी शोधणं किंवा चॅलेंज देणं लोकांना आवडतं. हे फोटो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडत असतात, कारण या फोटोंच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तर होतंच, त्याबरोबरच मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. लोक आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी असे चॅलेंजेस स्वीकारतात, कारण आपल्या मेंदूलादेखील व्यायामाची गरज असते. दररोज तेच तेच काम करून मेंदू जास्त काम करणं बंद करतो, त्यामुळे त्याला थोडं बुस्ट करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक चॅलेंज आणलं आहे.

ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात, कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. ऑप्टिकल इल्युजन ऑनलाइन सोडवताना खूप मजा येते. याचं उत्तर लवकर शोधायचं असेल तर तुम्ही रोज एक तरी ऑप्टिकल इल्युजन सोडवायला हवं. रोज एक कोडे सोडवले की सरावाने तुम्हाला उत्तर शोधायला सोपं जातं.

येथे पाहा फोटो

optical illusion
पुस्तकांच्या गर्दीत पेन्सिल शोधा (Photo-social media)

आता आम्ही तुमच्यासाठी एक ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत. हा व्हायरल होत असलेला फोटो पाहा, ज्यामध्ये तुम्हाला अनेक पुस्तकं दिसतील. या पुस्तकांच्या गठ्ठ्यात एक पेन्सिल लपली आहे, ती तुम्हाला शोधून दाखवायची आहे. पुस्तकांच्या गठ्ठ्यात कुठेतरी एक पेन्सिल लपली आहे. पेन्सिल शोधणे हे तुमच्यासाठी आव्हान आहे. आम्हाला खात्री आहे की, तुम्ही पेन्सिल लवकरच शोधून काढाल, ज्यासाठी तुमच्याजवळ फक्त १५ सेकंद आहेत. जरी तुम्हाला हे खूप सोप्पं वाटत असलं तरी कठीण आहे. पण, तुम्ही प्रयत्न केल्यास हे कोडं सोडवणं शक्य होईल. 

पेन्सिल शोधण्यासाठी तुम्हाला डोळ्यांवर फार जोर द्यावा लागणार आहे. आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या खालच्या भागात पेन्सिल शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यात हिरव्या रंगाची पेन्सिल दिसेल, जी पुस्तकांमध्ये दडलेली आहे. हा फोटो बारकाईने पाहिल्यास तुम्हाला पेन्सिल सापडू शकते.

तुम्हाला पेन्सिल दिसली का?

आम्ही तुम्हाला सांगतो की, ९९ टक्के लोक पेन्सिल शोधण्यात अपयशी ठरले आहेत. इतरांच्या तुलनेत तुम्ही हे आव्हान स्वीकारू शकता. त्याच वेळी, जे अजूनही या चित्रात गोंधळलेले आहेत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. खालील वर्तुळात आम्ही ते पेन्सिल कुठे आहे ते सांगत आहोत.

या चित्रातील पेन्सिल तुम्ही पाहिलीत का? वास्तविक हे चित्र अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, त्यात पेन्सिल शोधणे प्रत्येकाला सोपे नाही. ही अशी कोडी आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात, यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजनही होते.