IQ Test: असं म्हणतात नेहमी स्वतः बघितल्याशिवाय विश्वास ठेवू नये, पण अनेकदा तुम्हाला जे दिसतंय ते तसंच असेल असंही ठामपणे सांगता येत नाही. अशावेळी तुमच्या बुद्धीचा खरा कस लागतो. अशीच एक साधी चाचणी आपण आता पाहणार आहोत, ज्यात तुम्हाला विश्लेषणात्मक आणि तर्क कौशल्य वापरून उत्तर मिळवणे आवश्यक आहे. आपण न दिसणाऱ्या गोष्टींकडे वळण्यापेक्षा सुरुवात म्ह्णून साधं सरळ जे चित्रात दिसतंय त्यावरूनच प्रश्न सोडवणार आहोत. तुम्हाला इथे कोणाचाही स्वभाव किंवा अंदाज लावून गोष्टी ओळखायच्या नाहीत पण थोडा लॉजिकल विचार करण्याची गरज आहे. चला तर मग पाहुयात आजचं कोडं..
चला तर सांगा, इथे खाली दिलेल्या फोटोमध्ये माचिसच्या किती काड्या आहेत? आपण पाहू शकता की इथे समोर एक लाइटर आहे लाल माचिसच्या काठ्या त्याच्याभोवती विखुरल्या आहेत. महत्त्वाची हिंट म्हणजे लायटर पारदर्शक नसतो त्यामुळे माचिसच्या काड्यांची संख्या मोजताना, तुम्हाला हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
चला फोटो पाहुयात..या कोड्याचं उत्तर लेखाच्या अगदी खाली आहे, तुमचं उत्तर ठरलं की खाली तपासून पहा. ऑल द बेस्ट!

उत्तर
तुम्ही फोटोमधील सर्व माचीस काड्या काळजीपूर्वक पाहिल्यास, लक्षात येईल की लाइटर पारदर्शक नसल्याने त्यात बाहेरील बाजूस पडलेल्या काड्यांचे प्रतिबिंब दिसू शकते. तर, आता जर तुम्ही काड्या मोजाल तर तुम्हाला दिसेल की लायटरच्या आजूबाजूला ८ माचिसच्या काड्या दिसतील. खाली दिलेल्या फोटोत सर्व ८ काड्या दाखवल्या आहेत..

वरील ब्रेन टीझर हा तुमची बुद्धिमत्ता आणि निरीक्षण कौशल्य तपासण्याचा एक मजेदार मार्ग आहे. या प्रकारच्या कोडींना निर्धारित वेळेत सोडवण्यासाठी गणिती कौशल्याऐवजी लॉजिकची आवश्यकता असते. तुमचं उत्तर बरोबर आलंय का हे कमेंट करून नक्की कळवा.