ऑप्टिकल इल्यूजन तुम्हाला कधीकधी गोंधळात टाकू शकतात. जर तुम्हाला असे ऑप्टिकल इल्यूजन पाहायला आवडत असेल तर आमच्याकडे असे काहीतरी आहे जे पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर तयार केले जातात जे आपल्या डोळ्यांना फसवतात पण आता एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये निसर्गाने तयार केलेले ऑफ्टिकल इल्यूजन पाहून तुम्ही आवाक् व्हाल. सध्या एक ऑप्टिकल इल्यूजनचा व्हिडीओ चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये गडद अंधार असलेला बोगदा दिसतो पण व्हिडीओ जसा पुढे जातो तसे हे काहीतरी वेगळेच असल्याचे लक्षात येते.
@Rainmaker1973 या हँडलने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ कारच्या आतून रेकॉर्ड केल्याचे दिसते. ही कार एका गडद बोगद्याजवळ येत असल्याचे दिसते. दूरून समोर एक गडद अंधार असलेला बोगदा दिसतो आहे. पण, जशी जशी कार त्या बोगद्याजवळ पोहचते सर्व चित्र बदलून जाते. कार बोगद्याजवळ पोहोचल्यावर, ते जंगलातील झाडांमधील रस्त्यावरून जाताना दिसते जिथे कोणताही अंधार किंवा बोगदा नाही. मग प्रश्न असा पडतो की अंधार असल्यासारखा भास का निर्माण झाला.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये, @Rainmaker1973 ने लिहिले, “थायलंडच्या पहिली(Pahili) येथील या झांडाच्या बोगद्यामध्ये एक विलक्षण ऑप्टिकल इल्यूजन तयार होत आहे. येथे दुरून अत्यंत गडद अंधार दिसतो, परंतु एकदा का तुम्ही जवळ आला की डोळे प्रकाशाबरोब नैसर्गिकरित्या अॅडजस्ट होतात.”
ही पोस्ट १० ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आली होती. शेअर केल्यापासून ती दहा लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. आणि अनेकांनी पसंती दर्शवली असून कमेंट्सही केल्या आहेत.
हेही वाचा – मुंबईच्या रिक्षावाल्यांची बंगळुरुच्या रिक्षाचालकांबरोबर केली तुलना; म्हणे, ”UPI पेमेंटसुध्दा घेत नाही”
एका व्यक्तीने लिहिले, “निसर्ग कधीकधी खूप मनोरंजक असू शकतो.” दुसऱ्याने लिहिले की, “हे सुंदर आहे.
”चित्रपटासारखे वाटते!” असे तिसऱ्याने म्हटले. तर चौथ्याने सांगितले, “रात्री येथून जाण्याची कल्पना करा.”
“