अनेकांसाठी ऑप्टिकल इल्यूजन हा आवडीचा विषय असतो. ऑप्टिकल इल्यूजन सोडविणे, अनेकांना आवडते. सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो चांगलाच चर्चेत आहे. हा फोटो पाहून अनेक जण बुचकाळ्यात पडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो व्हायरल

या फोटोमध्ये किनारी वाळू असलेला समुद्र दिसत आहे आणि रात्रीच्या अंधारात समुद्राच्या लाटा दिसत आहेत पण या फोटोमध्ये तुम्हाला चुकीचे दिसत असेल तर.. होय, हा फोटो समुद्राचा नाही.
हा फोटो Massimo या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सुरुवातीला तुम्हाला समुद्र किनारा, आभाळ आणि तारे दिसणार त्यानंतर …”

या फोटोवर युजर्सनी अनेक उत्तरे दिली आहेत. युजर्सच्या मते हा फोटो खूप संभ्रमित करणारा आहे. यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एक युजर लिहितो, “मला फक्त समुद्र, समुद्रकिनारा दिसत आहे.”

हेही वाचा : Optical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई? एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…

नेमकं काय आहे फोटोमध्ये?

खोलवर विचार करायला लावणारा हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो आहे. या फोटोमध्ये कारचा खालील भाग दाखवला आहे. फोटोमध्ये कारचा दरवाजाही दिसत आहे.

हेही वाचा : लोकल ट्रेनमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला अन्… पाहा अंगावर काटा आणणारा Video

आता तुम्हाला फोटोमध्ये खरंच कारचा दरवाजा दिसत आहे का की अजूनही समुद्रकिनारा दिसत आहे? जर तुम्हाला आताही समुद्रकिनारा दिसत असेल तर तुम्ही फोटोचे आणखी निरीक्षण करायला पाहिजे. सध्या हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion of beach or something else photo goes viral on social media ndj