Optical Illusions : ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो संभ्रमित करणारे असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. एका बेडकाचे छायाचित्र रेखाटलेला ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो तुम्हाला थक्क करणारा आहे. कारण- या फोटोमध्ये हा बेडूक नसल्याचे सांगितले आहे. पण, फोटोमध्ये तो खरंच बेडूक आहे का की तसा भास आहे; चला तर जाणून घेऊ या ….
सुरुवातीला आपल्याला फोटोमध्ये बेडकाचे चित्र रेखाटल्याचे दिसेल; पण ऑप्टिकल इल्युजनमध्ये सांगितल्याप्रमाणे, हे बेडकाचे चित्र नाही; तर त्या फोटोमध्ये घोडा आहे. तुम्हाला या फोटोमध्ये खरंच घोडा दिसत आहे का? एकदा प्रयत्न करून बघा.
हेही वाचा : एका बॉयफ्रेंडसाठी रस्त्यावरच दोन मुली भिडल्या, तुफान हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
Softtote Software या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून, या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘हे खरंच खूप मोठं आव्हान आहे. ९९ टक्के लोक घोडा शोधू शकणार नाहीत. मित्रांनो, तुम्हाला या फोटोमध्ये घोडा दिसतो का?’
सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक युजर्स या फोटोमध्ये घोडा शोधू शकले नाहीत.
हेही वाचा : खोडकर माकड चक्क वाघांशी भिडलं, त्रासलेल्या वाघांचा Video पाहून पोट धरुन हसाल
खरंच या फोटोमध्ये घोडा आहे का?
हो, या फोटोमध्ये घोडा आहे. तुम्हाला या फोटोमध्ये सुरुवातीला बेडूक दिसेल; पण तो बेडूक नसून घोडा आहे. घोडा पाहण्यासाठी चित्र उलट दिशेने फिरवावे; मग तुम्हाला स्पष्टपणे घोड्याचे चित्र दिसेल. संभ्रमित करणारा हा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.