आपण जेव्हा एखादं चित्र किंवा फोटो पाहतो तेव्हा त्यावर आपली नजर खिळून राहते. फोटो किंवा चित्रात नेमकं काय आहे? याबाबत उत्सुकता असते. रंगसंगतीसोबत त्यामागच्या भावना शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. चित्रकलेत अनेक प्रकार आहेत. त्यापैकी ऑप्टिकल इल्युजन एक प्रकार आहे. या चित्रांमधून आपल्याला सहज उत्तर मिळणं कठीण होत. त्यामुळे अशी चित्र पाहताना आपण बांधलेला अंदाज आणि त्यामागे दडलेलं चित्र यात फरक जाणवतो. त्यामुळे अनेकदा ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो समजणं कठीण होतं. सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजन असलेले असंख्य फोटो व्हायरल होत असतात. या फोटोमध्ये तुम्हाला पूर्णपणे अडकवून ठेवण्याची क्षमता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी एक ऑप्टिकल इल्युजन चित्र लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हायरल चित्रात तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला कळेल की त्यात एक नाही तर चार वेगवेगळ्या महिला आहेत. ओलेग शुप्लियाक या युक्रेनियन कलाकाराने हे चित्र साकारलं आहे. अशी चित्र काढण्यात शुप्लियाक यांचा हातखंडा आहे. ‘फोर वूमेन’ नावाचं हे चित्र त्यांनी २०१३ साली काढलं होतं. हा चित्र पहिल्यानंतर पहिल्यांदा एक महिला फोनवर बोलताना दिसत आहे. पण जेव्हा तुम्ही महिलेचा गाळाकडे असलेला हात पाहाल, तेव्हा तुम्हाला आणखी एक महिला दिसेल. तिसरी महिला शोधणं तसं कठीण आहे. पण तुम्ही महिलेच्या डाव्या बाजूने तुम्ही नाक, डोळे आणि ओठांच्या जोडीचा आकार पाहू शकता. तिसरी महिला बाजूच्या प्रोफाइलमधून दिसते. चौथी महिला शोधणे सोपं असून पहिल्या महिलेच्या पोटावर ओठ दिसतील. तेथून चौथी महिला शोधणं सोपं होतं.

ऑप्टिकल इल्युजन असलेलं चित्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना चार महिला शोधण्याचं आव्हान देत आहेत. अनेकांना फोटोतील महिला शोधणं कठीण जात आहे. मात्र काही जण चुटकीसरशी ऑप्टिकल इल्युजन फोटोतील महिला शोधत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion photo of women viral on social media rmt