Optical Illusion: ऑप्टिकल इल्युजनचं सौंदर्य म्हणजे ही चित्रं आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला फसवण्यासाठी असतात. अशी चित्रे पाहतात आपल्याला जे दिसतंय तेच सत्य आहे असा विश्वास निर्माण करतात, पण तसे मुळीच नसते. आतापर्यंत तुम्ही विविध प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन पाहिले असतील. दृष्टिभ्रम करणाऱ्या या फोटोंच्या मदतीनं काही वेळेस आपण आपली हुशारी देखील तपासून पाहू शकतो. खरं तर अशा प्रकारची कोडी सोडवणं ही एक कलाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तल्लख बुद्धी आणि तिक्ष्ण नजर असलेली मंडळीच योग्य उत्तर शोधू शकतात. असंच एक ऑप्टिकल इल्युजन आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
माणसांवर कधी कधी अशी वेळ येते की यावेळी डोक्यानं विचार केला तर तो त्या परिस्थितीतून सुखरुप बाहेर येऊ शकतो. अशीच वेळ या व्यक्तीवर आलीय. समजा तुम्ही एका खोलीत बंद झाला आहात. आणि तेवढ्यात या खोलीला आग लागली तर तुम्ही आपला जीव वाचवण्यासाठी काय कराल? तुमच्याजवळ चार पर्याय आहेत. चला तर मग विचार करूया हे जीव वाचवण्यासाठी काय करता येईल बरं…खाली दिलेल्या पर्यायांपैकी काय करता येईल याचा विचार करा आणि उत्तर द्या. याआधी हे लक्षात घ्या की तुमच्याकडे फार कमी वेळ आहे.
१ – जमिनीवर झोपाल
२ – टेबलावर उभं राहाल
३ – कपडे काढून टाकाल
४ – टेबलाखाली झोपाल
सांगा पाहू जीव वाचवण्यासाठी या चारपैकी कोणता पर्याय योग्य आहे. भल्याभल्यांना उत्तर देता आलेलं नाही चला पाहूया तुम्हाला हे कोडं सुटतेय का?
हे कोडं सोडवण्याासाठी तुम्हाला थोडं डोक लावावं लागेल. असं समजा की तुम्ही एका बंद खोलीमध्ये आहात आणि अचानक आग लागली यावेळी या आगीतून बाहेर पडण्यासाठी किंवा स्वत:ला वाचवण्यासाठी तुम्ही काय कराल? कारण लाकडी सामान तर आगीत सहज जळून जाईल. खोली बंद असल्यामुळे फायरब्रिगेड येईपर्यंत तुम्हाला स्वत:ला वाचवायचं आहे.
कोणता पर्याय निवडाल?
अशा परिस्थितीत काय करावं? हे तुम्हालाही कळत नाहीये का? थांबा नाराज होऊ नका…खाली दिलेलं चित्र पाहा त्यामध्ये तुम्हाला योग्य उत्तर सापडेल.
हे पाहा हे आहे योग्य उत्तर
या परिस्थितीत तुम्ही पहिल्या पर्यायाचा अवलंब करु शकता त्यामुळे १ हे योग्य उत्तर आहे. आगीपासून वाचण्यासाठी जमिनीवर झोपणं हा उत्तम मार्ग आहे.