Optical Illusion: ऑफिसमध्ये आठवडा भर राबून डोकं पार जड झालं असेल ना? डोक्याचा भार कमी करायचा असेल तर खेळ खेळणं खूप महत्त्वाचं आहे, आणि त्यातही बुद्धी लावून खेळायचे खेळ म्हणजे एका दगडात दोन पक्षी, हो ना? टाईमपास पण होतो आणि आपल्याला भार न घेता नवनवीन गोष्टी शिकायलाही मिळतात. तुम्हाला माहीतच असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्येही तुमचं निरीक्षण कौशल्य किती उत्तम आहे हे तपासलं जातं, अगदी परफेक्ट वाटणाऱ्या परिस्थितीत नेमकं काय गंडलंय हे शोधून काढणारा माणूस नेहमीच फायद्यात राहतो. हेच निरीक्षण कौशल्य तपासण्यासाठी अलीकडे ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार खूप ट्रेंड होऊ लागला आहे. असंच एक ऑप्टिकल इल्युजनचं कोडं आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ऑप्टिकल इल्युजनमध्ये एका घरातील जेवणाची खोली दिसत आहे. यात तुम्हाला चॅलेंज असे की या चित्रात आपल्याला एक लिपस्टिक शोधून काढायची आहे. गंमत म्हणजे आतापर्यंत हे कोडे पाहिलेल्या केवळ १ टक्के लोकांना याचं योग्य उत्तर शोधता आलं आहे, तुमच्या हुशारीने तुम्हीही या एक टक्के तल्लख ग्रुपचा भाग होऊ शकता. तत्पूर्वी आता खेळ म्हंटला की नियम आलाच तुम्ही ही लिपस्टिक शोधण्यासाठी केवळ ११ सेकेंदाचा वेळ मिळणार आहे. चला तर मग फोटो पाहुयात…
काय झाली ११ सेकंद? अजूनही नाही सापडली का लिपस्टिक? एक हिंट घ्या.. चित्राच्या मध्यभागी जवळून पहा. खाऊच्या डब्याजवळ दुधाच्या भांड्यापाशी काही दिसतंय का?
कुठे आहे लिपस्टिक?
हे ही वाचा>> Video: गर्दीच्या ट्रेनमध्ये ‘ती’ एकटी चढताच पुरुषांनी तोंडं लपवली; प्रत्येकासमोर जाऊन म्हणाली “तुला.. “
जर तुम्हाला दिलेल्या वेळेत लिपस्टिक सापडली असेल तर अभिनंदन! आणि सापडली नसेल तर पुढच्या वेळेसाठी ऑल द बेस्ट!