Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या चित्रामध्ये भरपूर पाने दिसत आहेत. या पानाच्या मध्ये एक भयानक किडा लपलेला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.
१० सेकंदात उत्तर शोधा
या चित्रात भरपूर पाने दिसत आहेत. या पानांच्या मध्ये एक भयानक किडा देखील आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. मात्र, या किडयाला शोधण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फोनमध्ये १० सेकंदाचा टायमर सेट करावा लागेल. तुम्ही जर नीट लक्ष देऊन हा फोटो पाहिलात तर तुम्हाला फोटोमधील किडा सहज दिसेल. मात्र यासाठी तीक्ष्ण नजरेची गरज आहे. हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न अनेकजणांनी केला आहे मात्र ते यात अपयशी ठरले आहेत. तुम्ही जर हे कोडे सोडवलात तर तुम्ही बुद्धिमान व्यक्तींच्या यादीत समाविष्ट व्हाल.
( हे ही वाचा: Optical Illusion: या चित्रात तुम्हाला सर्वात आधी कोणता प्राणी दिसला? यावरून ठरेल तुमचे व्यक्तिमत्व)
तुम्हाला किडा दिसला का?
अनेकांनी लपलेला किडा शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण योग्य उत्तर शोधण्यात काही हुशार लोकच यशस्वी झाले. जर तुम्हाला या फोटोमध्ये लपलेला किडा दिसत नसेल तर फोटोच्या वरच्या भागात योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही, जर तुम्हाला बरोबर उत्तर मिळत नसेल तर काही फरक पडत नाही, खाली दिलेल्या फोटोमध्ये योग्य उत्तर पहा.
( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमध्ये लपला आहे एक भयानक साप; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवू शकता का?)
फक्त १% लोक यशस्वी झाले!
या फोटोने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ऑप्टिकल भ्रम इतके मजेदार आहेत की प्रत्येकाला ते सोडवणे आवडते. एवढेच नाही तर ते सोडवल्यानंतर लोक स्वतःला हुशार समजू लागतात. तुम्हीही हे कोडे सोडवले असेल तर तुमचे मन आणि डोळे आश्चर्यकारक आहेत.