Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या चित्रामध्ये एक बाग आहे आणि त्यात एक पोपट लपलेला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.
२० सेकंदात पोपट शोधा
हा फोटो काळजीपूर्वक पहा आणि पोपट शोधण्याचा प्रयत्न सुरू करा. पण योग्य उत्तर शोधण्याआधी तुमच्या मोबाईलमध्ये टायमर नक्की सेट करा. अवघ्या २० सेकंदात, फार कमी लोकांना हे कोडे सोडवण्यात आणि लपलेला पोपट शोधण्यात यश आले आहे. रंगीबेरंगी बागेच्या मध्यभागी एक हिरवा पोपट शोधणे प्रत्येकासाठी जमेलचं असं नाही.

( हे ही वाचा: Optical Illusion: तुम्हाला या पानांमध्ये लपलेला किडा दिसला का? १० सेकंदात शोधण्याचे चॅलेंज स्वीकारा)
तुम्हाला पोपट दिसला का?
फोटो नीट बारकाईने पाहिल्यास तुम्हाला योग्य उत्तर मिळू शकते. अनेकांनी पोपट शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण योग्य उत्तर शोधण्यात काही लोकच यशस्वी झाले. जर तुम्हाला या फोटोमध्ये लपलेला पोपट दिसत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही, आम्ही तुम्हाला योग्य उत्तर सांगू. फोटोमध्ये लपलेल्या पोपट कुठे लपलाय हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला फोटो पहा…

( हे ही वाचा: Optical Illusion: या चित्रात तुम्हाला सर्वात आधी कोणता प्राणी दिसला? यावरून ठरेल तुमचे व्यक्तिमत्व)
हे कोडे फक्त काहीच लोक सोडवू शकले
या फोटोने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ऑप्टिकल भ्रम इतके मजेदार आहेत की प्रत्येकाला ते सोडवणे आवडते. एवढेच नाही तर ते सोडवल्यानंतर लोक स्वतःला हुशार समजू लागतात. तुम्हीही हे कोडे सोडवले असेल तर तुमचे मन आणि डोळे आश्चर्यकारक आहेत.