Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. ज्यात एका माणसांनी भरलेल्या खोलीत एक भूत लपलंय. त्याला तुम्हाला शोधायचं आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

फोटोत लपले आहे भूत!

व्हायरल होत असलेल्या फिटोमध्ये एक रूम दिसत आहे. या इतक्या माणसांनी भरलेल्या खोलीत भूतही आहे. हे भूत शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त १० सेकंद आहेत. कोडे सोडवण्यापूर्वी, तुमच्या मोबाइल फोनमध्ये १० सेकंदांचा टायमर सेट करण्यास विसरू नका. तुम्ही हा फोटो सतत काळजीपूर्वक पाहिल्यास तुम्हाला नक्की बरोबर उत्तर सापडेल.

( ही ही वाचा: चित्रात लपला आहे एक खतरनाक दरोडेखोर; ५ सेकंदात त्याला शोधून दाखवा)

तरीही तुम्हाला योग्य उत्तर मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देऊ. आम्ही तुम्हाला सांगतो की फोटोच्या उजव्या बाजूला योग्य उत्तर लपलेले आहे. आता तुमचे सर्व लक्ष फोटोच्या उजव्या बाजूला असलेल्या लोकांवर ठेवा आणि तुमच्या उत्तराचा अंदाज लावा. तुम्ही तुमच्या उत्तराचा अंदाज लावला असेल, तर तुमचे उत्तर बरोबर आहे की नाही ते खालील फोटोमध्ये पहा…

( हे ही वाचा: Optical Illusion: तुम्हालाही मुलीच्या हातात आयफोन दिसतोय का? जाणून घ्या १५० वर्षे जुन्या चित्रामागील सत्य)

फक्त काही लोक कोडे सोडवू शकले

फोटोमध्ये दिसणारी ही व्यक्ती भूत आहे कारण त्याची सावली मागील आरशात दिसत नाही. बारकाईने पाहिल्यास याला भूत म्हणण्याचे दुसरे कारणही कळेल आणि ते म्हणजे त्याचे दात कुत्र्याचे आहेत. इशारा न वापरता दिलेल्या वेळेत योग्य तर्कासह योग्य उत्तर शोधले असते, तर तुमचा मेंदू खरोखरच अद्भुत आहे.

Story img Loader