ऑप्टिकल इल्यूजन हे आपल्या बुद्धिमत्तेची चाचणी घेणारे एक मजेशीर कोडे आहे. अनेक लोकांना ऑप्टिकल इल्यूजनचे कोडे सोडवयाला आवडते. तुमच्या व्यक्तिमत्त्वाबाबत जाणून घेण्यासाठी देखील ऑप्टिकल इल्यूजनची चाचणी देखील घेतली जाते. पारंपरिक चाचण्यांमध्ये व्यक्तिमत्त्वाचे मुल्यमापन हे एक साधा प्रश्न आणि त्याच्या उत्तरावर अवलंबून असते. पण आता ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो वापरून व्यक्तिमत्त्वाची चाचणीद्वारे मानवी मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑप्टिकल इल्यूजनवर आधारित चाचण्या व्यक्तीच्या वैयक्तिक मानसशास्त्राची ( individual psychology) खोलवर तपासणी करण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन देतात. व्यक्तीची वर्तणूक किंवा व्यक्तीचे प्राधान्य याबाबत स्पष्टपणे प्रश्न विचारण्याऐवजी या चाचण्यांमध्ये व्हिज्युअल इल्यूजनचा वापर करून मनात दडलेल्या गोष्टींवर समोर आणल्तया जातात. या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीला एक फोटो दाखवला जातो जो पाहिल्यानंंतरमेंदूच्या प्रतिसादावरून व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये स्पष्ट होतात.

व्यक्तिमत्व चाचण्यांच्या संदर्भात, हे इल्यूजन हे मनाचा आरसा म्हणून काम करते. फोटो पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय असते यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसून येते. आजच्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये एक वाघ आणि माकड दिसत आहे. फोटो पाहिल्यानंतर तुम्ही प्रथम काय पाहता ते हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही स्वभावाने व्यावहारिक आहात किंवा सर्जनशील आहात की नाही हे ठरवता येते.

हेही वाचा – प्रेमाच्या भांडणात एक मच्छर ठरला खलनायक! किशोरवयीन मुलीची प्रेमकथा झाली व्हायरल

हेही वाचा – ऐकावे ते नवलंच! कारमध्ये मागची सीट काढून बसवले कमोड; व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाल, “स्पीड ब्रेक

तुम्हाला प्रथम काय दिसले? वाघ की माकड?

१) जर तुम्ही पहिल्यांदा वाघ पाहिला तर तुम्ही एक व्यावहारिक व्यक्ती आहात जो गोष्टींचे विश्लेषण करण्यात आणि नंतर इतरांना समेजल अशा पद्धतीने समजावून सांगण्यात चांगले आहात. याची दुसरी बाजू अशी आहे की, तुम्ही काही वेळा थोडे हट्टी असू शकता आणि तुमच्या पद्धतीने गोष्टी करण्यास प्राधान्य देऊ शकता. तुमचा कम्फर्ट झोन सहज सोडणारा तुम्ही नाही. जेव्हा गोष्टी तुमच्या मना विरुद्ध होतात तेव्हा तुम्हाच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण होते. कोणत्याही परिस्थितीत चांगला उपाय शोधण्यासाठी तुम्ही नेहमी तुमच्या विश्लेषणात्मक मनावर अवलंबून राहू शकता.

२) जर तुम्ही माकड पहिले असेल तर तुमच्याकडे सर्जनशील मन आहे आणि खूप चांगल्या कल्पना आहेत, परंतु ते सर्व कृतीत आणण्यासाठी तुमच्याकडे क्वचितच पुरेसा वेळ असतो. आपण बहुतेक समस्यांसाठी एक योग्य, सर्जनशील उपाय शोधू शकता, म्हणून कठीण परिस्थितींना सामोरे जाणे तुमच्यासाठी कठीण नाही. तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यात आनंद आहे आणि तुम्ही परिस्थितीबाबत लवचिक आहात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला काय चालले आहे याकडेही लक्ष देत आहात याची खात्री करा कारण तुम्ही काही वेळा तुमच्या स्वतःच्या जगात हरवून जाऊ शकता.

(टीप – हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion test tiger or monkey what you see first reveals whether you are practical or creative snk
Show comments