Optical Illusion: आपल्यापैकी प्रत्येकामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही गुण असतात. आपण एखाद्या गोष्टीकडे जसे पाहतो त्यानुसार आपल्यावर सकारात्मक व नकारात्मक गुणवैशिष्ट्यांपैकी कशाचा प्रभाव जास्त आहे हे सिद्ध होतं. अगदी सोपं उदाहरण सांगायचं तर, अर्धा भरलेला ग्लास काहींना अर्धा रिकामा दिसतो. दृष्टिकोन हा फक्त एखाद्याची विचारसरणीच नाही तर त्याच्या स्वभावाविषयी, त्याच्या क्षमतेविषयी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगतो. आता बघा आकाशात ढग दाटले असताना आपल्यापैकी अनेकांना फक्त पांढरे, काळे – करडे ढग दिसतात पण काही जण असतात ज्यांना त्या ढगांमध्ये एखादा विशिष्ट आकार दिसून येतो. ही मंडळी खऱ्या अर्थाने ‘आउट ऑफ द बॉक्स’ विचार करणारी असतात. गंमत म्हणजे आपल्याला वाटतं म्हणून आपला दृष्टिकोन अमुक एक प्रकारचा आहे असं सिद्ध होत नाही, उलट काहीवेळा अनावधानाने ज्या गोष्टी आपण करतो किंवा एखाद्या साध्या गोष्टीकडे कसलाही विचार न करताना आपण जसे पाहतो त्यानुसार आपला दृष्टिकोन ठरतो. याचीच परीक्षा घेण्यासाठी सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनच्या अनेक टेस्ट (Optical Illusion Test Photo) व्हायरल होत असतात. यातील एक चाचणी आज आपण पाहूया..

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो आधी पाहा. यामध्ये तुम्हाला पहिल्या तीन सेकंदात काय दिसतंय हे वाटल्यास कुठेतरी लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा. आता आपण तुम्हाला दिसलेली गोष्ट ही तुमच्याविषयी काय सांगते हे जाणून घेऊया..

(फोटो सौजन्य: yourtango.com)

तुम्हाला दिसलेल्या गोष्टीचा अर्थ काय?

१) माणसं- जर आपल्याला या फोटोमध्ये प्रथमदर्शनी माणसं दिसली असतील तर यावरून असे लक्षात येते की तुम्ही फार विचार न करता प्रवाहासह वाहत जाणाऱ्यांपैकी आहात. तुमचा हा स्वभाव अनेकांना आवडतो आणि परिणामी तुमच्याकडे अनेकजण आकर्षित होतात. जर तुमचे मित्र एखादा फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतील आणि सर्वात आधी हो म्हणणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तर तुम्हाला या चित्रात माणसे दिसण्याची शक्यता सर्वाधिक आहे. याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात. नवीन हॉटेल्समध्ये नव्या प्रकारचे पदार्थ चाखणे, नव्या ठिकाणी फिरायला जाणे, साहसी गोष्टी करणे हे तुमचे छंद असू शकतात. तुमचे मित्र तुम्हाला विश्वासू समजतात. पुढे काय करायचं याविषयी स्पष्टता असल्याने तुम्ही फार भरकटत नाही. आयत्या वेळी केलेल्या प्लॅन्समध्ये सुद्धा झोकून दिल्याने तुम्ही आयुष्यात अनेक गोष्टींची मजा लुटू शकता.

२) उडती तबकडी: तुम्हाला जर फोटोमध्ये उडती तबकडी दिसली असेल तर तुम्ही फार निर्मळ मनाचे आहात हे त्यातून सिद्ध होते. तुम्ही प्रेमळ, खरे आणि संयमी आहात. तुम्ही पहिल्याच नजरेत एखाद्याबद्दल अंदाज बांधून मोकळे होत नाही. तुमचे मित्र जेव्हा धोक्याचे किंवा नेहमीपेक्षा वेगळे निर्णय घेतात तेव्हा तुम्ही त्यांना पाठिंबा देता. तुमचा इतरांना स्विकारण्याचा स्वभाव तुमच्याकडे लोकांना आकर्षून घेतो. तुमच्या स्वभाव समजूतदार असल्याने तुमच्याशी फार कुणी वाद घालत नाही. फार साहसी, पराक्रमी आयुष्य नसले तरी जे आहे ते आहे व त्यात समाधान शोधणे आपले काम आहे असा तुमचा दृष्टिकोन असतो.

हे ही वाचा<< सोनिया गांधी यांच्या हातात सिगारेट पाहून नेटकऱ्यांनी तुफान शेअर केला तो फोटो! पण ‘या’ लहानश्या गोष्टीमुळे सिद्ध झालं खरं

३) एलियन: आता तुम्हाला प्रथमदर्शनी जर या चित्रात एलियन दिसला असेल तर तुमचा स्वभाव हा साध्या गोष्टीत हटके बाजू शोधून काढणारा आहे हे सिद्ध होते. तुम्ही प्रेमळ आहात पण तुम्हाला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात. चुकलो तरी स्वतःच्या जीवावर हे तुमच्या आयुष्याचं सूत्र असतं. तुम्ही स्वतःचे फॅन असू शकता. स्वतःला मुक्तपणे जगणे आवडत असल्याने तुम्ही इतरांना सुद्धा बांधून ठेवत नाही. तुम्ही समोरच्याला प्रामाणिक मत देता त्यामुळे एखादी व्यक्ती चुकत असेल तर तुम्ही त्याला/ तिला डोळे झाकून प्रोत्साहन देणार नाही. तुमचा खरेपणा इतरांना भावतो त्यामुळे तुम्ही लोक जोडू शकता पण तुम्हाला मोठ्या गटाचा भाग होणे आवडत नाही.

तुम्हाला वरीलपैकी कोणती गोष्ट सगळ्यात आधी दिसली आणि त्यानुसार बांधलेले अंदाज किती खरे आहेत हे कमेंट करून नक्की कळवा.