सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन असणारी शेकडो चित्रे आपल्याला सापडतील. यामधील अनेक चित्र खूपच मनोरंजक असतात, तर बरीच चित्रे आपल्याला गोंधळात टाकतात. काही चित्रांमध्ये दडलेल्या गोष्टी शोधताना तर आपल्या नाकीनऊ येतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की एका नवरदेवाची साखरपुड्याच्या वेळी नवरीला घालायची अंगठी हरवली आहे. या फोटोमध्ये तुम्हाला केवळ ९ सेकंदांमध्ये हरवलेली ही अंगठी शोधून काढायची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या फोटोमध्ये लपलेली अंगठी शोधताना तुमच्या नजरेला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. अनेकदा अशा चित्रांमध्ये लपलेली गोष्ट आपल्या डोळ्यासमोरच असते पण आपण ती शोधण्यात अपयशी ठरतो. आपण या फोटोमध्ये लग्नाचे दृश्य पाहू शकतो. यामध्ये सर्व तयारीनंतर लोक लग्नाची अंगठी शोधताना दिसत आहेत. तुम्हाला त्यांना मदत करायची असून अवघ्या नऊ सेकंदांमध्ये ही अंगठी शोधून काढायची आहे.

खास ‘या’ व्यक्तीला भेटण्यासाठी प्राजक्ता माळीची राज ठाकरेंच्या दीपोत्सव कार्यक्रमात हजेरी; पाहा Photos

या चित्रामधील नवरदेव आणि नवरी खूपच त्रासलेले दिसत आहेत. हरवलेली वस्तू या क्षणी अतिशय महत्त्वाची आहे. वराचा मित्र त्याला अंगठी शोधून देण्यात मदत करत आहे. तर तिथे उपस्थित असलेले सगळेच अंगठी शोधून हैराण झाले आहेत. तुम्हाला यावेळी नवरदेवाला मदत करून त्याची हरवलेली अंगठी शोधून काढावी लागेल. तुमच्याकडे केवळ नऊ सेकंदांचा अवधी आहे. कारण जर अंगठी वेळेत मिळाली नाही तर हे लग्न तुटूही शकते. यावेळी तुमच्या तीक्ष्ण नजरेची गरज आहे.

तुम्हाला जर ही अंगठी सापडली असेल तर तुमची नजर खरोखरच कमाल आहे. मात्र अद्याप तुम्हाला अंगठी सापडली नसेल तर तुम्ही नीट लक्षपूर्वक फोटो पाहावा लागेल. डाव्या बाजूला लक्षपूर्वक पाहिल्यास तुम्हाला अंगठी नक्की सापडेल.