सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. आज व्हायरल होणार फोटोही यातीलच एक आहे. हा फोटो ‘ऑप्टिकल इल्युजन’चे उत्तम उदाहरण आहे. हा फोटो पाहून भल्याभल्यांचे डोळे चक्रावले आहेत. या चित्रात काही प्राणी आहेत. या चित्रातील सर्व प्राणी ओळखण्यासाठी तुम्हाला अनेक वेळा हे चित्र पहावे लागेल. यानंतरही, चित्रात लपलेल्या प्राण्यांची नेमकी संख्या तुम्हाला सांगता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यासोबतच, चित्रात लपलेल्या प्राण्यांच्या संख्येबाबतही लोक प्रश्न विचारत आहेत. बहुतेक लोक योग्य उत्तर देऊ शकले नाहीत. जर तुम्ही स्वतःला एक सुपर जिनियस समजत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत, तर चित्रात लपलेल्या प्राण्यांची नेमकी संख्या आणि चित्रात लपलेल्या प्राण्यांची नावे सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता.

या Viral Photo मध्ये लपलेली मुलगी शोधणे इतके सोपे नाही; तुम्हीही करून पाहा प्रयत्न

जर तुम्हाला चित्रात लपलेले सर्व प्राणी सापडले तर तुम्ही देखील सुपर जिनियसच्या श्रेणीत सामील व्हाल. सुपर जीनियसची श्रेणी महत्त्वाची आहे कारण आतापर्यंत फक्त दोन-तीन लोकांचा या श्रेणीत समावेश झाला आहे.

जर तुम्ही चित्रात लपलेले प्राणी शोधायला सुरुवात केली, तर तुम्हाला सर्वप्रथम हत्ती, घोडा, मांजर आणि कुत्रा हे प्राणी दिसतील. जर तुम्हाला या चित्रात लपलेले सर्व प्राणी शोधायचे असतील, तर तुम्हाला खूप धीर धरावा लागेल, कारण या चित्रात तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त प्राणी लपलेले आहेत.

Optical Illusion : तुम्ही ‘या’ चित्रामध्ये सर्वात आधी काय पाहिले? यावरून ओळखता येईल तुमचं व्यक्तिमत्त्व

जर तुम्हाला अजून प्राण्यांची एकूण संख्या समजली नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की या चित्रात एकूण १६ प्राणी आहेत. यामध्ये डास आणि साप यांसारख्या जीवांचाही समावेश आहे.

चित्रात लपलेले सर्व प्राणी पाहण्यासाठी तुम्हाला चित्र थोडेसे झूम करावे लागेल.

आता तुम्ही सोशल मीडियावर फोटो शेअर करून तुमच्या मित्रांना टॅग करू शकता आणि त्यांच्या नजरेची चाचणी घेऊ शकता.