Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. ज्यात तुम्हाला फोटोमध्ये लपलेला एक दरोडेखोर शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.
चित्रात लपलेला दरोडेखोर कोण?
( हे ही वाचा: Optical Illusion: तुम्हालाही मुलीच्या हातात आयफोन दिसतोय का? जाणून घ्या १५० वर्षे जुन्या चित्रामागील सत्य)
हे चित्र टेडियाडोने शेअर केले आहे, ज्यामध्ये काही माइम कलाकार बनवले आहेत. ते वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत, कोणी बॉल्समध्ये जुगलबंदी करत आहे तर कोणी सायकल चालवत आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या रंगाचे फुगेही धरले आहेत. या दृश्यात कुत्रे आणि ढग देखील दिसत आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये एक दरोडेखोर आहे, जो माईम कलाकारांसारखा दिसतो, पण त्याच्याकडे बघताच तुम्ही त्याला ओळखू शकाल. त्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे ५ सेकंद आहेत. तसे, हे कोडे देखील ४ सेकंदात सोडवले गेले आहे.
तुम्ही त्याला शोधू शकलात का?
बआम्हाला आशा आहे की तुम्हाला तो दरोडेखोर आत्तापर्यंत सापडला असेल. तरीही जर तो तुम्हाला सापडला नाही, तर तो चित्राच्या खालच्या बाजूचा असून दरोडेखोर असल्याने त्याने चेहऱ्यावर मास्कही लावला आहे. तरीही तुम्ही त्याला ओळखत नसाल, तर ढगाजवळ पिवळा फुगा धरलेल्या माईम कलाकाराला पाहून तुम्हाला कळले असेल. डाकूचा मुखवटा घातलेल्या एखाद्याला लुटण्याची त्याने पूर्ण तयारी केली आहे.
( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमधील वृद्ध शोधतोय त्याच्या हरवलेल्या बायकोला; तुम्ही त्याची मदत करू शकता का?)
येथे पाहा दरोडेखोर
असे भ्रम मजेदार आहेत
लोकांना सोशल मीडियावर असे ऑप्टिकल भ्रम सोडवणे आवडते. असे कोडे सोडवल्यानंतर अनेकांना आत्मविश्वास मिळतो.