Optical Illusion News : ऑप्टिकल इल्युजन हा बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. याला दृष्टीभ्रम सुद्धा म्हणतात. खरं तर ऑप्टिकल इल्यूजन हे एक कोडे असते. या कोड्यांमध्ये कधी अंक, कधी वस्तू, कधी नाव तर कधी प्राण्यांचे, पक्षांचे,तसेच माणसाचे चित्र शोधायचे असते. हे ऑप्टिकल इल्यूजन सोडवायला अनेकांना आवडते.
सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही ऑप्टिकल इल्युजन इतके सोपे असतात की सहज सोडवले जातात पण काही ऑप्टिकल इल्यूजन इतके कठीण असतात की सोडवणे अशक्य वाटते. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका बेडकाचे चित्र दिसत आहे पण हे बेडकाचे चित्र नाही, मग कोणते चित्र आहे? हे आज आपल्याला शोधायचे आहे. आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Optical Illusion this not frog in a Photo solve and optical illusion and find out which animal is there)
ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion)
व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनमध्ये तुम्हाला एक फोटो दिसेल. या फोटोमध्ये तुम्हाला बेडूक दिसेल पण तुम्हाला जर कोणी सांगितले की हे बेडकाचे चित्र नाही, तर तुम्हाला कदाचित धक्का बसेल. मग हे चित्र कशाचे आहे?
पाहा व्हायरल पोस्ट
thefunnypep या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर लिहिलेय, “तुम्हाला बेडूक दिसतेय की घोडा दिसतोय?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काही युजर्सनी घोडा दिसत असल्याचे लिहिलेय तर काही युजर्सनी बेडुक दिसत असल्याचे लिहिलेय.
खरंच हे घोड्याचे चित्र आहे का?
या फोटो सुरुवातीला पाहिल्यानंतर तुम्हाला बेडकाचे चित्र दिसेल. पण जेव्हा तुम्ही नीट लक्ष केंद्रित करून पाहाल तेव्हा तुम्हाला या चित्रामध्ये घोडा दिसेल. अधिक चांगल्याप्रकारे पाहण्यासाठी तुमची स्क्रिन डाव्या बाजूने वळवा. तुम्हाला स्पष्टपणे घोडा दिसेल.
![optical illusion](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-81.jpg?w=830)
या पूर्वी सुद्धा असे अनेक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.