ऑप्टिकल इल्युजन असणारे फोटो सोशल मीडियावर विशेष पसंत केले जातात. या फोटोमध्ये असलेली कोडी सोडवायला नेटकऱ्यांना आवडतं. लोकांमध्ये या कोड्यांची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते. असेही म्हटले जाते की ऑप्टिकल इल्युजन फोटोमधील कोडी मेंदूच्या व्यायामासाठी उपयुक्त असतातच, पण त्याचबरोबर ते आपल्या व्यक्तित्त्वाविषयीही बरीचशी माहिती सांगू शकतात.
अशा चित्रांमध्ये आपल्याला सर्वप्रथम काय दिसते यावरून आपल्या व्यक्तित्त्वामधील काही पैलू जाणून घेण्यास मदत होऊ शकते. या चित्राबद्दल असा दावा करण्यात आला आहे की या चित्रामध्ये तुम्ही सर्वप्रथम काय पाहिलं, यावरून तुमच्या आयुष्यातील प्रेमसंबंधांविषयी माहिती जाणून घेता येईल. तुम्ही या चेहऱ्यामध्ये सर्वप्रथम काय पाहिलं? घोडा? घोडेस्वार, शिपाई, ढग, महिलेचा चेहरा की डोंगर?
ज्यांना सर्वप्रथम घोडा किंवा सैनिक दिसले…
जर तुम्हाला चित्रात प्रथम घोडा दिसला तर याचा अर्थ असा आहे की अशा लोकांना प्रपोजल नाकारले जाण्याची भीती वाटते. दुसरीकडे, जर तुम्हाला फोटोमध्ये उभे असलेले सैनिक आधी दिसले, तर तुम्हाला प्रेमामध्ये तुमच्या भावनांचा खेळ होईल अशी भीती वाटत राहते. मात्र असे लोक त्यांच्या नात्याबाबत खूप संवेदनशील असतात.
‘इंजिनिअर सोडून कोणीही चालेल’; लग्नाच्या जाहिरातीत स्पष्टच उल्लेख, Photo Viral
ज्यांना सर्वप्रथम घोडेस्वार दिसला…
जर चित्रात सर्व प्रथम तुमची नजर घोडेस्वार सैनिकांवर पडली असेल तर याचा अर्थ असा आहे की प्रेमात तुम्हाला तुमच्या दिसण्यावरून सतत भीती सतावत असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रेझेंटेबल आहे की नाही, त्याचा तुमच्या नातेसंबंधांवर चुकीचा परिणाम तर होणार नाही ना, याचीही तुम्हाला सतत काळजी वाटते.
ज्यांना सर्वप्रथम महिला दिसली…
जर तुम्ही चित्रातील स्त्रीला प्रथम पाहिले असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला भीती वाटते की प्रेमात पडून तुमची झोप उडेल. तथापि, याचा अर्थ असाही आहे की आपण वास्तविकता आणि काल्पनिकता यांच्यात संतुलन राखण्यास शिकलात.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)