सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ आपलं मनोरंजन नक्कीच करतात. पण सतत व्हायरल होणाऱ्या घटनांचे व्हिडीओ पाहून अनेकदा कंटाळाही येतो. मात्र, ऑप्टीकल इल्यूजनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि अनेकांचा कंटाळा दूर करतात. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी अशा माणसांच्या बुद्धीला चालना देतात. अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एक इंग्रजी शब्द लपलेला आहे आणि तो तुम्हाला अवघ्या १२ सेकंदात शोधून दाखवायचा आहे.
व्हायरल झालेल्या या फोटोला तुम्ही खूप लक्ष देऊन पाहिलं तरंच तुम्हाला इंग्रजी शब्द शोधता येणार आहे. कारण फोटोला सर्व बाजूंनी काळ्या-पांढऱ्या रंगाच्या रेषांनी व्यापलं आहे. पण याच रेषांमध्ये एक इंग्रजी शब्द लपलेला आहे. हा शब्द शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीला कस लावावा लागणार आहे. हे कोडं सोडवण्यासाठी तुमच्याकडे १२ सेकंदांचा अवधी असणार आहे. जर खरंच तुम्ही दिलेल्या वेळेत हा शब्द शोधून दाखवला, तर आम्ही नक्की म्हणू तुमच्याकडे गरुडासारखी दृष्टी आहे. पण जर काही कारणास्तव तुम्ही शब्द शोधू शकला नाही, तर याचा अर्थ असा होत नाही की, तुमचे डोळे खराब आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल फोटो
आप्टिकल इल्यूजनचं उत्तर
या फोटोतील शब्द शोधून शोधून तुम्ही थकला असाल, तर काही हरकत नाही. आम्ही तुम्हाला त्या शब्दाबाबत सांगतो. या फोटोत लपलेला इंग्रजी शब्द SEE असा आहे. ज्यांना हा शब्द शोधण्यात यश मिळालं असेल, त्यांनी नक्कीच बुद्धीला चालना दिली असणार, हे आम्हाला माहितेय. कारण या फोटोत असलेल्या पांढऱ्या-काळ्या रंगाच्या रेषा सतत पाहिल्यानंतर डोळ्यांना अंधुक चित्र दिसल्यासारखं वाटतं.