Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन ही एक बौद्धीक क्षमता तपासणारी चाचणी आहे. ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं की बुद्धीचा वापर करून कोडे सोडवावे लागते पण काही ऑप्टिकल इल्यूजन इतके कठीण असतात की सोडविणे अवघड जाते.
सोशल मीडियावर अशा अनेक कठीण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो-व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो चर्चेत आहे. या फोटोमध्ये खरे प्रतिबिंब ओळखायचे आहे.
व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला तलावाकाठी असलेला हिरवागार परिसर दिसतो ज्याचे प्रतिबिंब हूबेहूब तलावात दिसत आहे पण या फोटोवर खरे प्रतिबिंब कोणते, खालील का वरील? हा प्रश्न पडतो.
जर आपण फोटो फिरवला तर तुम्हाला सारखीच प्रतिमा दिसणार. हिरवागार परिसर आणि हूबेहूब त्याचे प्रतिबिंब तलावात दिसणार आणि मग प्रश्न निर्माण होते की खरे प्रतिबिंब कोणते? संभ्रमित करणारा हा फोटो आहे. हा फोटा पाहून खरं उत्तर शोधणे कठीण आहे, असे वाटते.
हेही वाचा : Optical Illusions : तुम्हाला फोटोमध्ये समुद्र दिसतोय का? पण हा समुद्र नाही, एकदा क्लिक करून पाहा
opticalillusionss या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. काही यूजर्सनी खालील बाजूस खरे प्रतिबिंब असल्याचे लिहिले आहे तर काही यूजर्सनी वरील बाजूस खरे प्रतिबिंब असल्याचे लिहिले आहे. एक यूजर लिहितो की खालील बाजूचे खरे प्रतिबिंब आहे कारण पाण्यात ढग इतके स्पष्ट दिसत नाही.