Viral: सोशल मीडियावर डोकं चक्रावून सोडणारे अनेक फोटो व्हायरल होत असतात. सध्या ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे आपल्या डोळ्यांना फसवणारे फोटो चर्चेत असतात. हे फोटो पाहून डोके लावावे लागते. हे फोटोमध्ये एक कोड असते जे लोकांना सोडवावे लागते. कधी कधी फोटोत लपलेली गोष्ट शोधायला सांगतात जी समोर असूनही दिसत नाही. कित्येक लोक हे कोडे सोडवण्याचे चॅलेंज घेतात खरं पण प्रत्याक्षत फार कमी लोक हे कोडं सोडवू शकतात. आता पुन्हा असाच एक सर्वांना चक्रावून टाकणारा फोटो व्हायरल होत आहे जो पाहून लोक सांगू शकणार नाही की त्यात अभ्यास करणारी व्यक्ती घराच्या आत आहे की बाहेर? जर तुम्हाला नेहमीच्या ऑप्टिकल इल्युजन फोटोचा कंटाळा आला असेल, तर हे नक्कीच तुम्हाला आवडेल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये घनदाट जंगलात एक घर दिसत आहे आणि एक माणूस टेबलावर बसून व्यायाम करताना दिसत आहे. त्या व्यक्तीच्या शेजारी त्याचा पाळीव कुत्राही दिसतो. पण फोटोतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेबलावर अभ्यास करणारी व्यक्ती नक्की कुठे बसली आहे हे मात्र कोणालाच समजत नाही. एकदा हा व्यक्ती घराच्या आत बसला आहे असे वाटते दुसऱ्याक्षणी तो घराच्या बाहेर बसला आहे असे वाटते.
हेही वाचा – तुम्ही ५ सेंकदात फोटोमधील मांजर शोधू शकता का? 99 टक्के लोकांना सापडले नाही उत्तर….
अखेर कुठे बसला आहे हा व्यक्ती?
१० सेकंद डोळे बंद करा. तुमच्या मनाला आराम द्या. डोळे उघडा आणि फोटो पहा. माणूस कुठे बसला आहे असे तुम्हाला वाटते? घराच्या आत की बाहेर? तुमच्या उत्तराचा जास्त विचार करण्याची गरज नाही.
![Optical illusion Where Is The Old Man Sitting Inside Or Outside ( फोटो- इन्स्टाग्राम)](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/07/loksatta-6.jpg?w=830)
जर तुम्हाला वाटत असेल की माणूस घरात बसला आहे तर तुमचे उत्तर बरोबर आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की माणूस घराबाहेर बसला तरीही तुमचे उत्तर बरोबर आहे.
![Optical illusion Where Is The Old Man Sitting Inside Or Outside ( फोटो- इन्स्टाग्राम)](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/07/loksatta-7.jpg?w=830)
जर तुम्ही म्हणाल की माणूस घराबाहेर आणि आत दोन्ही आहे तरीही हे उत्तर बरोबर आहे.
अहो, हीच तर एक मनोरंजक गोष्ट आहे कारण हे ऑप्टिकल इल्यूजन आहे.
हेही वाचा – दोन गायी अन् एक डोकं? फोटो पाहून गोंधळून जाल; सांगा पाहू, कोणत्या गायीचं आहे हे डोकं?
नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
सोशल मीडियावर लोकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेक लोक म्हणतात की ती व्यक्ती घराच्या आत बसली आहे परंतु काही लोक असे मानतात की तो घराबाहेर बसला आहे. काही लोक म्हणतात की, ”तो घराबाहेरही आहे, घरातही आहे आणि घराच्या खाली देखील आहे”
तर काही जण म्हणतात की, ”दोन्ही उत्तर बरोबर आहे कारण हा एक भ्रम आहे.”