Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन ही एक बौद्धिक चाचणी आहे. अनेक लोकांना ऑप्टिकल इल्यूजन सोडविणे खूप आवडते पण काही ऑप्टिकल इल्यूजन इतके कठीण असतात की सोडविणे जिकिरीचे असते. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये १ ते ५२ पर्यंत आकडे दिलेले आहे आणि यातील एक हरवलेला नंबर शोधण्यास सांगितले आहे. सध्या हे ऑप्टिकल इल्यूजन चांगलेच चर्चेत आहे.
या फोटोमध्ये तुम्हाला १ ते ५२ आकडे दिसतील. यातील एक आकडा गायब आहे, तोच आकडा शोधण्याचे हे ऑप्टिकल इल्यूजन आहे. सुरुवातीला हे सर्वांना सोपे वाटणार पण नंतर हे इल्यूजन कठीण वाटायला लागते.
हेही वाचा : चंद्र तोडून वगैरे नाही… तर पठ्ठ्याने हातानेच साकारला चंद्र; Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क
opticalillusionss या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर युजर्सनी ऑप्टिकल इल्यूजन सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक युजर्सनी खरे उत्तर दिले आहे.
ऑप्टिकल इल्यूजनचे खरे उत्तर
ऑप्टिकल इल्यूजनचे हे कोडे खूप सोपे आहे. तुम्ही बारकाईने १ ते ५२ पर्यंत आकडे मोजणार तर तुम्हाला गायब असलेला आकडा दिसून येईल. या फोटोमध्ये ३२ नंबरचा आकडा गायब आहे. अनेक युजर्सनी कमेंटमध्येही हेच उत्तर दिले आहे तर काही युजर्सनी शून्य हे सुद्धा उत्तर दिले आहे.