Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. ज्यात एका मुलीचा चेहरा दिसत आहे. मात्र, मात्र तो चेहरा कोणत्या दिशेला आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.
चेहरा नेमका कोणत्या दिशेला आहे?
( हे ही वाचा: Optical Illusion: खोलीतील माणसांमध्ये लपलंय एक भयानक भूत; तुम्हाला ते दिसलं का?)
हा फोटो पाहून तुम्हाला तुमच्या नजरेवर शंका येऊ शकते. तुमचे उत्तर काहीही असो, तुम्ही बरोबर आहात. कारण दोन्ही बाजूंनी दिसणारा चेहरा योग्य आहे. हे चित्र तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करते. चित्रातील मुलीचा चेहरा ज्या बाजूने दिसतो ती दिशा बरोबर दिसते, परंतु जेव्हा तुम्ही दुसऱ्या बाजूला चेहरा पाहता तेव्हा तो ही चेहरा बरोबर दिसतो. कारण ही एक ऑप्टिकल इल्युजन इमेज आहे. ऑप्टिकल भ्रम हे तुमच्या मेंदूला फसवण्यासाठी असतात.
असे भ्रम मजेदार आहेत
लोकांना सोशल मीडियावर असे ऑप्टिकल भ्रम सोडवणे आवडते. असे कोडे सोडवल्यानंतर अनेकांना आत्मविश्वास मिळतो.