Optical Illusion: ज्याप्रमाणे शरीर निरोगी ठेवाण्यासाठी आपण व्यायाम करतो, चांगला आहार घेतो त्याप्रमाणे बुद्धीला तल्लख बनवण्यासाठी काही लोक अवघड कोडी सोडवतात. बुद्धीचा कस लावण्यासाठी आज काल ऑप्टिकल इल्यूजनला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. ऑप्टिकल इल्यूजन हे असे कोडे आहे ज्यामध्ये उत्तर तुमच्या समोरच असते पणे सहजासहजी तुम्हाला दिसत नाही. डोळ्यांना फसवणारे, बुध्दीला आव्हान देणारे ऑप्टिकल इल्यूजन सध्या लोकप्रिय ठरत आहे. याला मोठ्यापांसून छोटयापर्यंत सर्वांची पंसती मिळत आहे. सोशल मीडियावर रोज नवनवीन ऑप्टिकल इल्यूनज व्हायरल होत आहे जे लोक सोडवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला ही जर ऑप्टिकल इल्यूजन आवडत असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक नवीन चॅलेंज आहे.
तुम्हाला फोटोत सिंह दिसतोय का?
सध्या व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्यूजन असलेला हा फोटो पाहिल्यानंतर तुमचे डोकं नक्कीच चक्रावून जाईल. या फोटोमध्ये तुम्हाला एक सिंह दिसत आहे. पण या फोटोमध्ये सिंह नाही तर एक उंदीर आहे. तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिले तर त्यात तुम्हाला फोटोत लपलेला उंदीर देखील दिसेल. तुम्हाला फोटोतील उंदीर शोधायचा आहे. हे चॅलेंज अवघड नक्कीच आहे पण तुम्हाला हे सोडवण्यात खूप मज्जा येईल.
हेही वाचा – गुलकंद पान खायला आवडते का? पण गुलकंद कसे तयार होते माहितीये का? पाहा Viral video
५ सेंकदात शोधा फोटोत लपलेला उंदीर
फोटो पाहिल्यानंतर पटकन तुम्हाला सिंहाचे चित्र दिसेल पण उंदीर मात्र सहजासहजी दिसणार नाही. फार कमी लोक हे कोडे कोणत्याही मदतीशिवाय सोडवून शकले आहेत. जर तुम्ही स्वत:ला हुशार समजत असाल, तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्हाला या फोटोत लपलेला उंदीर शोधू दाखवा. तुमच्याकडे फक्त ५ सेकंदाचा वेळ आहे.
१
२
३
४
५
तुमचा वेळा संपला आहे.
तुम्हाल या फोटोत उंदीर सापडला का? सापडला असेल तर अभिनंदन तुम्ही अत्यंत हुशार आहात पण जर तुम्हाला उंदीर सापडला नसेल तर काळजी करू नका आम्ही तुमची मदत करणार आहोत.
तुम्हाला हा फोटो उलटा करायचा आहे…तुम्हाला फोटो लपलेला उंदीर सापडेल.