Optical Illusions : ऑप्टिकल इल्यूजनचे संभ्रमित करणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्यूजन हा आपली बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. काही ऑप्टिकल इल्यूजन इतके कठीण असतात की सोडवणे अशक्य असते.
सध्या असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये लोकांच्या गर्दीशिवाय काहीही दिसत नाही. पण, या फोटोमध्ये सर्वांचा आवडता भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसुद्धा आहे.
फोटो पाहून तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये आपल्याला लोकांच्या गर्दीमध्ये विराट कोहलीला शोधायचा आहे. सध्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
खरंच फोटोमध्ये विराट कोहली आहे का?
या व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमध्ये लोकांची भरपूर गर्दी दिसत आहे. फोटोमध्ये हजारो लोकं उभी असलेली दिसत आहेत. फोटो दूरवरून काढलेला आहे, त्यामुळे कुणाचाच चेहरा स्पष्ट दिसत नाही. अशात खरंच विराट कोहलीचा चेहरा आपल्याला दिसेल का? आणि खरंच फोटोमध्ये विराट कोहली आहे का? हे शोधावं लागेल.
ऑप्टिकल इल्यूजनचे उत्तर
फोटो दूरवरून काढल्याने कुणाचाच चेहरा स्पष्ट दिसत नाही. पण, या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की लोकं काही ठराविक अंतर ठेवून उभी आहेत. त्यांनी अंतर ठेवताना मध्ये जी जागा सोडली आहे, त्याकडे नीट लक्ष केंद्रित केले तर आपल्याला विराट कोहलीच्या चेहऱ्याचा अर्धा भाग दिसू शकतो. त्यासाठी फोटोकडे नीट पाहावे लागेल.
हा व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो tuza_bhau या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये विचारले आहे, “ओळखलं का?” यावर युजर्सनी प्रतिक्रिया देत उत्तरे दिली आहेत.
काही युजर्सनी लिहिलेय, “विराट कोहली”, तर काही युजर्सनी लिहिलेय, “रोहित शर्मा.” अनेक युजर्सनी विराट कोहलीच्या टी-शर्टचा नंबरसु्द्धा लिहिला आहे.