Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोडे ७ सेकंदात सोडवण्याचा प्रयत्न करा

( हे ही वाचा: Optical Illusion: गवतात लपला आहे भयानक वाघ; तुम्ही त्याला शोधू शकता का?)

या फोटोमध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक चेहरे दिसतील. सगळेच चेहरे सारखे असल्याचे दिसतील. याच फोटोमध्ये फेमस फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा चेहरा लपलेला आहे. सुरुवातीला इथे फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो नसल्याचे दिसून येईल. फोटोमध्ये उत्तर शोधण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये ७ सेकंदांचा टायमर सेट करावा. हा फोटो बारकाईने पाहिल्यास योग्य उत्तर मिळू शकेल.

योग्य उत्तर शोधणे कठीण आहे

जर तुम्ही क्रिस्टियानो रोनाल्डोला पाहू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला यासाठी मदत करू. या फोटोच्या डाव्या बाजूला शोधण्याचा प्रयत्न करा, येथेच तुमचे योग्य उत्तर लपलेले आहे. जर तुम्ही हिंट न वापरता प्रसिद्ध फुटबॉलपटू पाहिला असेल, तर अभिनंदन, तुमचे डोळे आणि मन खरोखरच तीक्ष्ण आहे. पण जर तुम्हाला योग्य उत्तर मिळाले नाही तर ठीक आहे, खालील फोटोमध्ये पहा…

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोत लपला आहे महिलेचा खुनी; तुम्ही त्याला शोधू शकता का? ९९% लोक ठरलीत अपयशी)

फक्त काही लोक यशस्वी झाले!

आम्ही तुम्हाला सांगूया की फक्त काही लोक हे अवघड कोडे ७ सेकंदात सोडवू शकले आहेत. हा फोटो अशा प्रकारे डिझाइन करण्यात आला आहे की प्रसिद्ध फुटबॉलपटूचा चेहरा पहिल्यांदा पाहिल्यावर दिसणार नाही. असे ऑप्टिकल भ्रम अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusions find famous footballer cristiano ronaldo in photo test your brain gps