viral Video : सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील; यात अनेक व्हिडीओ मेट्रोचेसुद्धा असतात. अनेकजण धावत्या मेट्रोत डान्स करतात, रील शूट करताना एकमेकांशी भांडतात, तर काहीजण मारामारीसुद्धा करताना दिसतात. पण, तुम्ही कधी मेट्रोत ‘फॅशन शो’ आयोजित केलेला पाहिला आहे का? तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. नागपूरमध्ये धावत्या मेट्रोत फॅशन शो आयोजित करण्यात आला होता.
२७ ऑगस्टला नागपूरमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये धावत्या मेट्रोत फॅशन शो कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण करण्यात आले होते. वारसा आणि संस्कृतीचे मिश्रण या थिमने हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. ५० मॉडेलसह लहान मुलांनीसुद्धा या फॅशन शोमध्ये वॉक केला असे सांगण्यात येत आहे. हा कार्यक्रम वेगवेगळ्या गटांमध्ये आयोजित करण्यात आला होता; ज्यामध्ये विविध व्यक्तींचा सहभाग होता. फॅशन शो दरम्यान पाश्चिमात्य, पारंपरिक पोशाखात अनेक तरुण मंडळी या कार्यक्रमात सहभागी झालेली दिसली. सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम ॲपवरील (@ittsmitu21) या अकाउंटवरून इन्फ्लुएंसरने हा व्हिडीओ शेअर केला आहे; जिचे नाव मिताली असे आहे. ज्यात तुम्ही या फॅशन शोची खास झलक पाहू शकता.
हेही वाचा… अबब! शेकडो मगरींच्या घोळक्यात मुलाने मारली उडी अन् घेतला पोहण्याचा आनंद; Video पाहून व्हाल थक्क
पोस्ट नक्की बघा :-
या व्हिडीओत अनेक तरुणी तुम्हाला मेट्रोत वॉक करताना दिसून येतील. नऊवारी नेसून, विविध स्टाईलचे पाश्चिमात्य, पारंपरिक पोशाख या तरुणींनी परिधान केले आहेत. चालत्या मेट्रोच्या अनोख्या फॅशन शोने मेट्रोतून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रवासी आपल्या मोबाईलमध्ये हे खास क्षण टिपून घेताना दिसत आहेत; तर अनेकजण टक लावून हा फॅशन शो बघत आहेत. नागपूर महामेट्रो ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ नावाची योजना चालवते, ज्या अंतर्गत ती विविध संस्था, गट आणि व्यक्तींना शुल्क आकारून असे कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देते, असे सांगण्यात येत आहे. नागपूरमध्ये धावत्या मेट्रोत आयोजित करण्यात आलेला हा फॅशन शो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.