अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. असं असलं तरी या सोहळ्याचा उत्साह सोशल नेटवर्किंगवरही दिसून येत आहे. ट्विटवरील सर्वच्या सर्व टॉप ११ ट्रेण्ड हे अयोध्या राम मंदिरासंदर्भातील आहे. अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनीही यासंदर्भातील ट्विट केले आहेत. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनीही एक खास फोटो ट्विट केला आहे. प्रसाद यांनी ट्विट केलेला फोटो हा संविधानाच्या मूळ प्रतीमधील एका पानाचा असून त्यावर भगवान राम आणि सीता मातेबरोबरच लक्ष्मणाचे चित्र असल्याचे प्रसाद यांनी लक्षात आणून दिलं आहे.
नक्की वाचा >> राम मंदिर भूमिपूजन सोहळा : याची देही याची डोळा… जाणून घ्या ४० वर्ष हिंदूंची बाजू मांडणाऱ्या ९२ वर्षीय व्यक्तीबद्दल
“भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर मूलभूत अधिकारांसंदर्भातील कायद्यांबद्दलचा उल्लेख असणाऱ्या भागाच्या सुरुवातील एक चित्र आहे. यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भवगान श्री राम, सीता माता आणि भगवान राम यांचे बंधू लक्ष्मण दिसत आहेत. रावणावर विजय मिळवून अयोध्येमध्ये परत येतानाचे हे दृष्य आहे. आज संविधानाची ही मूळ भावना मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे,” अशा कॅप्शनसहीत रवी शंकर प्रसाद यांनी हा फोटो शेअर केला आहे.
भारत के संविधान की मूल प्रति में मौलिक अधिकारों से जुड़े अध्याय के आरम्भ में एक स्केच है जो मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम, माता सीता और भाई लक्ष्मण के रावण पर विजय प्राप्त कर अयोध्या वापसी का है।
आज संविधान की इस मूल भावना को आप सभी से शेयर करने का मन हुआ। #जयश्रीराम pic.twitter.com/wFICxcAqQS— Ravi Shankar Prasad (@rsprasad) August 5, 2020
पेशाने वकील असणाऱ्या रवी शंकर प्रसाद यांनी बाबरी आणि रामजन्मभूमी खटल्यामध्ये काही काळ रामलल्लाची बाजू न्यायालयासमोर मांडली होती.