पाकिस्तानमधील वेगवेगळे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. पावरी गर्लचा व्हिडीओ असो किंवा हायवेवर धावणाऱ्या शहामृगाचा नवीनतम व्हिडीओ. सध्या हा हायवेवर धावणाऱ्या शहामृगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मिस्टर शहामृग लाहोरच्या रस्त्यावर वाहनांप्रमाणे धावताना दिसत आहेत, वाहनांशी स्पर्धा करत आहेत.

जगातील सर्वात मोठा पक्षी मानला जाणारा शहामृग पाकिस्तानातच्या लाहोरच्या रस्त्यावर धावताना दिसला. आता या घटनेला सर्वसाधारणपणे विनोदी म्हणणार नाही, कारण पक्ष्याचा जीव धोक्यात आला होता, पण हायवेवर त्याची धावपळ पाहून तुम्हाला एकदा हसू नक्कीच येईल. शहामृग सुसाट वेगाने वाहनांच्या मधोमध धावत आहे, पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे तो रस्त्यावर कसा पोहोचला?

( हे ही वाचा: हरभजन ट्विटरवरच टीम इंडियाची मस्करी करणाऱ्या पत्रकाराला भिडला, म्हणाला…! )

शहामृग रस्त्यावर कसा आला?

हा व्हिडीओ @Biiyaa नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की शहामृग रस्त्याच्या मधोमध सुसाट वेगाने धावत आहे. हा शहामृग लाहोरच्या रस्त्यावर कसा पोहोचला आणि त्याचा मालक कोण आहे हे कोणालाच माहिती नाही? विविध अंदाज बांधले जात आहेत. कोणी म्हणतात की शहामृग प्राणीसंग्रहालयातून पळून गेला आहे, कोणी म्हणतात की तो कोणाचा तरी शहामृग आहे.

( हे ही वाचा: ‘या’ पाच राशीचे लोक असतात सर्वात प्रामाणिक; कधीच कोणाला फसवत नाहीत )

व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरत नाही. शहामृगाकडे बघून असे वाटते की त्याला कुठेतरी जायला उशीर झाला आहे, म्हणून तो पळत आहे. अनेकांनी त्याला थेट विचारले – मास्टर, कुठे चालला आहात? मात्र, वर्दळीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या शहामृगांनाही धोका निर्माण होण्याची भीतीही अनेकांनी व्यक्त केली.

Story img Loader