मुक्या प्राण्यांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र काळजी करण्यासारखी बाब म्हणजे हे अत्याचार करणाऱ्यांमध्ये मोठ्या व्यक्तीच नाहीत तर किशोरवयीन मुलांचाही सहभाग वाढू लागला आहे. अशीच एक घटना हैदराबाद येथे घडली आहे. हैदराबात येथील कट्टेदान भागामधील क्रूर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधील मुलाने एका कुत्र्याच्या पिलाला दोरीने झाडाला लटकावल्याचे दिसले. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तो त्या पिल्लाला चौथ्या मजल्यावरून खाली फेकताना दिसला.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ अतिशय हृदयद्रावक आहे. यामध्ये कुत्र्याच्या एका लहानशा पिल्लाच्या गळ्यात दोरी बांधली असून या दोरीच्या साहाय्याने त्याला झाडावर लटकवण्यात आले आहे. तसेच, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये मुलगा पिलांचा चेहरा दाखवतो, त्याला चौथ्या मजल्यावर घेऊन जातो आणि हवेत फेकतो. त्यानंतर तो जमिनीवर मृतावस्थेत पडलेल्या पिलाचाही व्हिडीओ बनवतो.

Mavale statue, Shivsrushti Ratnagiri, Ratnagiri city,
रत्नागिरी शहरातील शिवसृष्टीमध्ये मावळ्यांच्या पुतळ्याची विटंबना; संशयित पोलिसांच्या ताब्यात
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Dombivli, local train passenger rescued
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट-रूळाच्यामध्ये अडकलेली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बचावली
Accident News
Video Viral News : चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल २० फूट खाली टँकरवर पडला; अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल
decrease in gold prices todays gold rate Nagpur news
सोन्याच्या दरात घसरण…लाडकी बहीणींचा आनंद द्विगुनीत…
Pet dog owner, Dombivli, Samrat Chowk,
डोंबिवलीत सम्राट चौकात पाळीव श्वान मालकाची वडील-मुलाला ठार मारण्याची धमकी
criminal murder pune, criminal murder by bouncer,
पुणे : मद्यालयातील बिलाच्या वादातून बाऊन्सरकडून सराइताचा खून, सिंहगड रस्ता भागातील घटना
CIDCO is in the process of giving land at a strategic location in Airoli sector to a large industrial group for the construction of a township
ऐरोलीतील मोक्याची जागा बड्या उद्याोगपतीला? टाऊनशिप उभारणीच्या नावाखाली ‘सिडको’चे अजब धोरण

Viral Video: दोन बैलांमध्ये झाली खतरनाक झुंज; मारामारी करत घरात घुसले आणि…; पाहा शेवटी कोण जिंकलं

दरम्यान, स्ट्रे फाऊंडेशन फॉर अ‍ॅनिमल्स आणि सिटीझन्स फॉर अ‍ॅनिमल्स फाऊंडेशन या दोन ना-नफा संस्थांकडे या घटनेची तक्रार करण्यात आली. यानंतर संस्थापक अदुलापुरम गौतम आणि पृथ्वी तेजा यांनी मेलरदेवपल्ली येथील पोलिसांकडे संबंधित घटनेची तक्रार केली. पृथ्वी आणि अदुलापुरम यांनी सांगितले की या मुलाने ड्रग्सचे सेवन केले होते आणि त्यांना असे वाटते की त्याने नशेत असतानाच या पिलाला निर्दयीपणे मारले. या मुलाचे सोशल मीडिया अकाउंट तपासले असता या मुलाने कुत्र्यांचेच नाही तर सिरिंज आणि ड्रग्सचेही व्हिडीओ पोस्ट केले होते.

संबंधित घटनेची प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानुसार या मुलाला पाच वर्षांसाठी तुरुंगातही जावे लागू शकते. मेलारदेवपल्ली सर्कल इन्स्पेक्टर पी मधु यांनी सांगितले की, “या मुलाची ओळख पटली असून त्याचे वय १९ वर्षे आहे. मात्र तो मनोरुग्ण असल्याने त्याला अटक करता आली नाही.” पोलिसांनी सांगितले की, किशोरचे समुपदेशन करण्यात आले आहे. मात्र, सध्या अंमली पदार्थांच्या सेवनाचा तपास अंमली पदार्थ विभागाकडून केला जात आहे.