कल्पना करा, तुम्ही अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला आणि अचानक तुमच्यासमोर ३५ साप आले तर….बापरे…कल्पना करूनही अंगावर काटा येतो आहे. तुम्हाला वाटेल हे फक्त चित्रपटांतच घडते. पण आसाममधील रहिवाशांबरोबर हे प्रत्यक्षात घडले आहे.

नागाव जिल्ह्यातील एका घरात ३५ हून अधिक साप आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडओ पाहून नेटकऱ्यांना धक्क बसला आहे. एएनआयवर या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एका मोठ्या खडकाच्या फटीमधून अनेक साप बाहेर पडताना दिसत आहेत. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रहिवासी सापांना मोठ्या टाकीत गोळा केल्याचे दिसत आहे.

Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
Meenakshi Seshadri Romantic rain song while she having diarrhea
सेटवर एकच शौचालय, पावसात रोमँटिक गाण्याचं शूटिंग अन्.., मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला अतिसार झाल्यावर चित्रीकरणाचा वाईट अनुभव
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल

आसाममधील नागाव जिल्ह्यातील कालियाबोर भागात एका घरात सुमारे ३५ जिवंत साप आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्राणीप्रेमी संजीब डेका यांनी हे साप पकडले आहेत,” एएनआयने लिहिले.

हेही वाचा – भरदिवसा व्यावसायिकाची कार चालकाला पिस्तूलाने बेदम मारहाण, Viral Video पाहून नेटकरली संतापले

व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर ९३, ०३,००० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले,”शौचालय बांधण्यासाठी चांगली जागा नाही, नंतर साप पुन्हा येऊ शकतात,” एका वापरकर्त्याने केली. “बाप रे माझ्या घरी साप दिसला तर मी मरून जाईन),” असे दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

हेही वाचा – चेहऱ्यावरील केसांमुळे ट्रोल झालेल्या प्राचीचा इन्फ्युएन्सर अनीशने केला मेकओव्हर, Viral Video पाहून ट्रोलर्सला बसेल धक्का!

एएनआयशी बोलताना संजीब डेका म्हणाले, “घर मालकाने मला सापांच्या उपस्थितीची माहिती दिली आणि मी घटनास्थळी पोहोचलो. त्या ठिकाणी बरेच साप रेंगाळत असल्याचे मला आढळले. मी घराच्या नवीन बांधलेल्या शौचालयातून सुमारे ३५ जिवंत साप वळवळत होते.. नंतर मी जोसागर दलानी परिसरात सापांना सोडले.

वृत्तानुसार, डेका यांनी यापूर्वी कालियाबो येथील चहाच्या मळ्यातून ५५ किलोपेक्षा जास्त वजनाच्या १४ फूट लांब बर्मी अजगराची सुटका केली होती.