Women Received Used Condoms By Post: काही लोकांमध्ये विकृत मानसिकता दिवसें दिवस वाढत चालली आहे. नुकतीच धक्कादायक घटना घडली आहे. विकृत मानसिकता असलेली एक व्यक्ती वापरलेले कंडोम महिलांना पाठवत आहे. त्याचबरोबर विचित्र हस्तक्षरातील पत्र महिलांना पाठवत आहे. या घडनेमुळे पोलिस देखील चिंतीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीबीसीच्या एक अहवालानुसार, हे प्रकरण ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील आहे. आतापर्यंत साधारण ६५ महिलांना अनोळखी व्यक्तीकडून कंडोम आणि हस्तलिखित पत्र मिळाले आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व घटना गेल्या तीन महिन्यांच्या काळात घडल्या आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार, सर्व पीडित महिलांनी १९९९ मध्ये किलब्रेडा कॉलेज गर्ल्स स्कुलमध्ये शिक्षण घेतले आहे. हाच एक सर्व घटनांना एकत्र जोडणारा हा दुवा आहे.

हेही वाचा –आता जोडप्यांना अंतराळात करता येणार लग्न! Space Weddingची अनोखी सुविधा कधी सुरू होणार, जाणून घ्या


पोलिसांनी सांगितले की या माहिलांना लक्ष्य करुन त्रास दिला जात आहे. २४ वर्षांपूर्वी महिलांनी कॉलेजच्या वार्षिक पुस्तकात आपला पत्ता लिहिला असावा, कदाचित तेथूनच सर्वांचा पत्ता मिळाला असावा.

हस्तक्षराची तपासणी करुन गुन्हेगाराचा घेणार शोध

पोलिस अधिकारी सार्जेट ग्रांच लुईस हे या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांनी सांगितले की, ”महिलांना मानिसकदृष्ट्या त्रास देण्यासाठी हे सर्व जाणून बुजून केले जात आहे. तो महिलांना लैंगिक आशय पाठवत आहे.”

हेही वाचा – “ही खरी माणुसकी” महिलेने बसमध्येच दिला बाळाला जन्म; कंडक्टरने केली प्रसुती, IAS ने केले कौतुक, म्हणाली..

अधिकारी ग्रांट लुईस सांगतात की, ”हे सर्व जे कोणी करत आहे त्याला थांबवले पाहिजे.आम्ही त्याला शोधून काढू. आम्ही गांभीर्याने हस्तक्षराची तपासणी करत आहोत. या चाचणीच्या आधारावर गुन्हेगाराला पकडणे सोपे होईल.”

एक महिलेने ऑस्ट्रेलियाच्या हेराल्ड सन्ससह संवाद साधताना सांगितले की ज्या दिवशी मला पत्र मिळाले त्या रात्री माझी झोप उडाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 60 women in australia received used condoms in mails the police have opened an investigation in the case snk
Show comments