viral Video: भारतीय रेल्वेगाड्यांमध्ये गर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. निवासस्थानी पोहोचण्यासाठी टॉयलेटमधून प्रवास करण्यापासून ते स्पायडरमॅनसारखं डब्यांच्या बाजूला चिकटून राहण्यापर्यंत प्रवासी अनेक गोष्टी करताना दिसतात. अलीकडील घटना दर्शविते की, परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे आणि प्रवाशांची गैरसोय पुन्हा एकदा अधोरेखित करते आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत ट्रेन प्रवाशांनी तुडुंब भरलेली असताना एक जोडपं चालत्या ट्रेनमध्ये चढताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक पुरुष आणि एक महिला चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. पुरुष प्रथम त्या महिलेला ट्रेनमध्ये चढण्यास मदत करतो आणि ती पायऱ्यांवर उभी राहते. त्यानंतर तिचा जोडीदार तिला आतमध्ये ढकलू लागतो; जेणेकरून त्याला उभं राहायलासुद्धा जागा होईल. त्यानंतर मग जोडीदार खालच्या पायऱ्यांवर चढतो आणि सामान गाडीच्या आतमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करू लागतो. एवढंच नाही, तर हे सर्व प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध बाजूनं सुरू असतं. सुरक्षा सोडा; पण त्या जोडप्याचं पाहिलं प्राधान्य फक्त ट्रेनमध्ये बसणं हेच होतं, असं दिसून येत आहे. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

modi dont have time for Manipur marathi news
लोकमानस: मोदींना मणिपूरसाठी वेळ नसावा?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
appoint developers to construct houses in slum Redevelopment Mumbai news
दोन लाख झोपु घरांची जबाबदारी पुन्हा विकासकांवरच?
Protest In Shimla Against Alleged Illegal Construction Of Mosque
हिमाचल प्रदेशात मशिदीतील अवैध बांधकामांबाबत निदर्शने ; आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा
Use wet socks to reduce fever in children
लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
Mahavitaran electricity customers increased adding 74 thousand new electricity connection in two years
महावितरणचे वीज ग्राहक वाढले, दोन वर्षात ७४ हजार नवीन वीज जोडण्या
peacocks die of electrical shock in bhadravati city
चंद्रपूर : सर्वांना भुरळ घालणाऱ्या मोराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

हेही वाचा…सिंहाला गोंजारणे पडलं महागात! तरुणाच्या अंगावर घेतली झडप अन्… पुढे जे घडलं ते पाहून फुटेल घाम; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, जीव धोक्यात घालून फक्त ट्रेनमध्ये बसण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. भारतीय गाड्यांच्या तीव्र गर्दीच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी अधिक गाड्या सोडणं असो, प्रवाशांकडे तिकीट असल्याची खात्री करणं असो किंवा सुरक्षिततेबद्दल जनतेला शिक्षित करणं असो; रेल्वे प्रवास सर्वांसाठी सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल करणं आवश्यक आहे, असं या व्हिडीओतून स्पष्ट दिसून येत आहे.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @IndianTechGuide या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘वंदे भारत आणि बुलेट ट्रेनसह आम्हाला प्राधान्य म्हणून अधिक ट्रॅक आणि स्वस्त गाड्यांची खरंच गरज आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. अनेक नेटकरी ही समस्या पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काही जण म्हणत आहेत, ‘या समस्येचा सामना करण्यासाठी या विशिष्ट मार्गांवर ट्रेनची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.’ तर एका युजरनं ‘या समस्या रोजच्या असल्या तरीही सहसा सणाच्या / कापणीच्या हंगामात असं घडतं जेव्हा स्थलांतरित कामगार / व्यक्ती त्यांच्या घरी परत जातात’, अशी कमेंट एका युजरनं केली आहे; जी तुम्हालासुद्धा विचार करायला नक्कीच भाग पाडेल.