मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचे नुकसान होत असते. त्याचबरोबर प्राण्यांचे देखील नुकसान होत असते. कधी-कधी पशू-पक्षी अशा संकटात सापडतात की ते स्वतः काही करू शकत नाहीत आणि अशा परिस्थितीत त्यांना माणसांच्या मदतीची गरज भासते आणि अर्थातच, जगात अजूनही काही चांगले लोक आहेत जे त्या प्राण्यांना मदत करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. इंटरनेट हा अशा व्हिडिओंचा खजिना आहे आणि आज आमच्याकडे एक हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे जो पाहून तुमचे ह्रदय पिळवूटन जाईल.
तारेमध्ये अडकलेल्या घुबडाचा जीव
हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून त्यात एक व्यक्ती घुबडाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. बिचार्या पक्ष्याचा एक पंख तारेत अडकला होता आणि झाडाच्या फांदीला धोकादायकपणे लटकला होता. व्हिडिओमध्ये एक माणूस वाहत्या पाण्याच्या प्रवाहात जातो आणि झाडाला लटकलेल्या घुबडाजवळ पोहचतो.
घाबरलेल्या घुबडाजवळ एका हाताने त्याला कापडाच्या जाळीमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या हाताने तारेपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर एका दगडावर ठेवून त्याच्या पंखाला अडकलेल्या तारेने थोडी आग लावून जाळतो आणि नंतर तार कापून त्याला तारेपासून पूर्णपणे मुक्त करतो घुबड हे करताना धीराने वाट पाहत असतो. त्यानंतर तो व्यक्ती घुबडाला पुन्हा जंगलात सोडून देतो.
हेही वाचा – भारतातील सर्वात सुंदर गावांचे फोटो पाहिले का! आनंद महिंद्रांनी शेअर केली त्यांची Bucket list, तुम्हीदेखील देऊ शकता भेट
पोस्ट २.७ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिली गेली आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. लोक त्या माणसाचे कौतूक केले आहे. अनेकांनी जंगल भागात घाण पसरवणे कसे टाळावे हे लिहिले.