जेवणाची चव आणि बिलावरून तक्रार करणाऱ्या ग्राहकाच्या चेहऱ्यावर उकळतं तेल फेकण्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. यात ग्राहक गंभीररित्या जखमी झाला आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगरच्या व्हिनस चौकात मनोज कोळीवाडा चायनिज कॉर्नर नावाची चायनिज पदार्थांची गाडी आहे. विकी मस्के आणि त्याचे तीन मित्र रात्री साडेअकराच्या सुमारास येथे जेवायला आले होते. जेवण झाल्यानंतर विकीचा हॉटेलमालकाशी जेवणाच्या चवीवरून वाद सुरू झाला. जेवणाची चव अतिशय वाईट असून तुलनेने जास्त पैसे मालक आकारत असल्याचे विकीचे म्हणणे होते. हा वाद इतका वाढला की मालकाने विकी आणि त्याच्या मित्रांवर उकळते तेल फेकले. यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकीने मालकाला धडा शिकवण्यासाठी आपल्या भावालाही बोलावून घेतले. त्यांचे भांडण बघता बघता विकोपाला पोहोचले आणि त्यानंतर मालकाने कढईत असलेलं उकळतं तेल भांड्यात घेऊन विकीच्या भावावर फेकले. यात विकीचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी ‘मिड डे’ या वृत्तपत्राला दिली आहे.

वडील झोपेत असताना ९ वर्षांच्या मुलीने फोनवरून बुक केली डिस्नेलॅण्डची ट्रीप

‘मंगळ’वारीसाठी १ लाखांहून अधिक भारतीयांनी केलं बुकिंग

Story img Loader