सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका बैलाने एका व्यक्तीची काय अवस्था केली आहे, ते तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. बैलाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी हा व्यक्ती ज्यापद्धतीने प्रयत्न करत आहे, ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल.
जीव वाचवण्यासाठी तरुणानं थेट…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक संतापलेला बैल एका व्यक्तीच्या मागे लागतो, दरम्यान स्वत:च्या बचावासाठी, बैलाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी हा व्यक्ती खांबावर चढला आहे. एक संतापलेला बैल सैरभैर पळत आहे. दिसेल त्याचा अंगावर हा बैल धावून जातोय. त्याचवेळी एका व्यक्तीच्या मागे हा बैल लागतो आणि हा व्यक्ती प्रचंड घाबरतो आणि जीव वावण्यासाठी वीजेच्या खांबाचा आधार घेतो. हा बैल त्या खांबाभोवती गोल गोल फिरतो आणि दुसरीकडे जाताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Viral video: आधी भांडला, मग रागात विमानातून उडी घेऊ लागला व्यक्ती
सोशल मीडियावर काही वेळेला अशा पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होतात की, त्याची चर्चा सगळीकडे असते. इंस्टाग्रामवर kuttykalaivanan नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.