अस म्हणतात की कलाकाराला वेदना झाल्या की त्या वेदना रंगाच्या रुपात कॅनव्हॉसवर उतरतात आणि या वेदनेतून तयार झालेली कलाकृती ही त्या कलाकाराची सर्वोत्तम कलाकृती असते. अनेक कलाकारांच्या बाबतीत असेच काहीसे झाले आहे. मग याला १८ वर्षांची क्लॉडिया अपवाद कशी ठरेल? ऑक्सफर्ड विद्यापीठात तिला कलेचे शिक्षण घ्यायचे होते पण या विद्यापीठाने तिला प्रवेश नकारला. पण यातून खचून न जाता तिने अशी काही सुंदर चित्र काढली आहेत की आता सोशल मीडियावर त्याची खूपच चर्चा आहे.
वाचा : …म्हणून ‘जिया’चे सारे चिनी दिवाने
असं म्हणतात कलाकार हा जगातील सगळ्यात संवेदनशील माणूस असतो त्याला दु:ख झाले की कुंचले आणि रंगातून तो आपल्या दु:खाला वाट मोकळी करून देतो आणि यावेळी त्याच्या हातून निर्माण झालेली कलाकृती ही जगातील किंवा त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम कलाकृती असते. या वाक्याला पुरेपुर जागली ती १८ वर्षांची क्लॉडिया. तिला जगप्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड विद्यापीठात कलेचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र या विद्यापीठाने तिला प्रवेश नाकारला. पण यातून खचून न जाता तिने सर्वोत्तम चित्रे काढली. आणि बघता बघता सोशल मीडियावर तिच्या चित्रांना प्रसिद्धी लाभली. तिची चित्रे विद्यापीठाच्या शिक्षकांवर छाप पाडू शकली नाहीत पण सोशल मीडियावर मात्र तिच्या चित्रांना खूपच प्रसिद्धी मिळत आहे. जिला ऑक्सफर्डने नाकारले तिला आता सोशल मीडियाने स्वीकारले.
वाचा : तुरुंगातील फ्रेंच कैद्याने पत्नीसाठी बनवला ताजमहाल
तिच्या आईने तिची चित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. अल्पवाधीतच तिच्या चित्रांना खूपच प्रसिद्धी मिळाली आहे. क्लॉडिया फक्त १८ वर्षांची आहे त्या तुलनेत तिने काढलेली चित्र ही फारच प्रगल्भ वाटत आहे. सोशल मीडियाद्वारे तिची चित्रे इतकी प्रसिद्ध झालीत की अनेक वृत्तपत्रांनी तिच्या चित्रांना प्रसिद्धी दिली आहे.