असं म्हणतात की जर तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल, तर ती गोष्ट तुमच्यासाठी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. चित्रपटातील संवाद असला तरी ओयो रूम्सच्या रितेश अग्रवालने हे खरे असल्याचे सिद्ध केले आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी शिक्षण घेऊन कंपनी सुरू करणाऱ्या मुलाची आज हजारो कोटींची कंपनी झाली आहे, याची कल्पना करू शकता. हेच देशातील Youngest Self Made Billionaire म्हणून आपला ठसा उमटवणारे ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत..त्यांचा दहा वर्षापूर्वीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो त्यांनी स्वत: ट्विट केलाय.
ट्विटमध्ये, अग्रवाल यांनी नमूद केले की ते कोणाबरोबर कॉलवर होता हे त्यांना नक्की आठवत नाही, परंतु वेबसाइट क्रॅश झाल्यामुळे रात्री १२ वाजता एक ग्राहक हॉटेल बुक करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, मला नक्की आठवत नाही की मी कोणाशी कॉल करत होतो पण आमची वेबसाइट क्रॅश झाल्यामुळे रात्री १२ वाजता हॉटेल बुक करण्याचा प्रयत्न करणारा ग्राहक असावा. OYO च्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये, माझा नंबर अगदी कस्टमर केअर पेजवर सुद्धा होता. तेव्हापासून आतापर्यंत आपण किती पुढे आलो आहोत याचा विचार केला तर हे अविश्वसनीय आहे! असे ते म्हणतात.
पाहा पोस्ट
हेही वाचा – मालदीवच्या समुद्रात उसळली मृत्यूची लाट! रस्त्यावरील लोक गाड्यांसह गेले वाहून, VIDEO पाहून अंगावर येईल काटा
अग्रवाल यांच्या प्रवासाबद्दल आणि OYO ने केलेल्या प्रगतीबद्दल नेटकरी रितेश अग्रवाल यांचं कौतुक करत आहेत. रितेश अग्रवालचा जन्म ओडिशातील बिसम कटक या छोट्याशा गावात झाला. रितेश अग्रवालचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ रोजी ओरिसातील बिसम कटक या छोट्याशा गावात झाला. Oyo Rooms चे संस्थापक रितेश हुरून देखील ग्लोबल रिच लिस्टमध्ये सामील झाले आहेत. या यादीनुसार अग्रवाल हे जगातील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी अग्रवाल यांच्याकडे सुमारे ७,८०० कोटी रुपयांची संपत्ती होती यावरून तुम्ही त्यांच्या यशाचा अंदाज लावू शकता.