OYO Founder meets PM Modi: ओयोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल यांनी २०१३ मध्ये ओयो रुम्सची भारतामध्ये स्थापना केली होती. गेल्या दहा वर्षांमध्ये या कंपनीने मोठी प्रगती केली आहे. रितेश यांना थिएल फेलोशिप मिळाली होती. कंपनीच्या सुरुवातीच्या काळात या फेलोशिपद्वारे मिळालेल्या पैश्यांची त्यांना मदत झाली होती. सध्या ८० देशांमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त जागांमध्ये ओयो रुम्सची सुविधा उपलब्ध आहे. या कंपनीमध्ये ५ हजारांहून जास्त कर्मचारी काम करत आहेत.
रितेश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवरुन त्यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मार्च २०२३ मध्ये रितेश यांचा विवाह संपन्न होणार आहे. या निमित्ताचे लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ते भावी पत्नी आणि आईबरोबर मोदींच्या कार्यालयामध्ये पोहोचले होते. भेटीदरम्यान भावी दांपत्याने पंतप्रधान मोदींच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. रितेश यांनी खांद्यांवर पांघरत त्यांचा सन्मान देखील केला.
Photo Viral: महाशिवरात्रीनिमित्त मुकेश अंबानी यांनी सोमनाथ मंदिराला दिली कोट्यवधींची देणगी
या फोटोंना त्यांनी ‘पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आशीर्वादाने आम्ही एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहोत. त्यांनी अत्यंत आपलेपणाने आमचे स्वागत केले. त्यांच्या या कृतीचे वर्णन मला शब्दांमध्ये करत येत नाही आहे. माझी आई त्यांच्या महिला सक्षमीकरणाच्या विचारांने प्रेरित झाली आहे. त्यांना भेटून माझ्या आईला खूप आनंद झाला. मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद’, असे कॅप्शन दिले आहे. भेटीदरम्यान त्यांनी भारतातील पर्यटनाबाबत देखील चर्चा केली असल्याचे रितेश यांनी सांगितले.
मार्चमध्ये लग्न झाल्यानंतर ते दिल्लीमध्ये मोठ्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहेत. त्यांच्या लग्नाला उद्योगजगतातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत असे म्हटले जात आहे. त्यांनी मोदींबरोबर शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.