Pune Mumbai Trending Video: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर
आता शिवाजी पार्कात फिरण्याची भीती? गर्दुल्ल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल; तुम्हीच सांगा याला जबाबदार कोण?
काय चूक होती त्या मुलींची? शाळेत जाणाऱ्या मुलींना भरधाव कारनं उडवलं; अक्षरश: १० फूट दूर फेकले, VIDEO पाहून थरकाप उडेल
"दारुचा नाद लय बेक्कार", ड्यूटीवर असताना अक्षरश: रस्त्यावर लोळला अन्…, पोलिसाचा VIDEO व्हायरल
Funny Video of tesla car Owner : टेस्ला कार मालकाचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत आला आहे. ...सविस्तर बातमी
VIDEO: जेव्हा खंडोबाचा नवस पावतो आणि नवरीला आवडीचा नवरा भेटतो; पाहुण्यांसमोर नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल
"आता जीव घेणार का?" रंगीबेरंगी सरबतामध्ये बुडवलेला बर्फाचा गोळा पाहून नेटकरी चक्रावले, Video Viral
Mango Juice | आमरस खाताय, तर सावधान ! सडक्या आंब्यांपासून आमरस, आरोग्याला धोकादायक
उन्हाळ्यात आमरस म्हंटल की, खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र, बाजारात विकत मिळणारा हाच आमरस किती खराब जागेवर बनवला जातो, किती सडलेल्या आंब्यापासून बनवला जातो हे पाहून नक्कीच आपण आमरस खातोय की आजारपणाला आमंत्रण देतोय? हा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.
भारतातून पाकिस्तानात लग्न करून गेलेल्या महिलांना घरवापसीची अडचण; बॉर्डरवर वेगळाच वाद
केंद्र सरकारने २७ एप्रिलपासून पाकिस्तानी नागरिकांसाठी असलेले सर्व वैध व्हिसा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर भारतात आश्रय घेणारी पाकिस्तानी कुटुंबे व्हिसा वैधतेची विनंती करत आहेत. वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल २०२५ पर्यंत वैध राहतील. याव्यतिरिक्त, भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा पूर्णपणे निलंबित केल्या आहेत, पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतेही नवीन व्हिसा प्रक्रिया किंवा जारी केले जाणार नाहीत.
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा जबरदस्त डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
पुण्यात भयंकर अपघात! काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या, पण पुढच्याच क्षणी…;नशीब अन् कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची पहलगाम हल्ल्याबाबत प्रतिक्रिया
Pahalgam Terrorism : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी पहलगाम हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, "१०० टक्के, पाकिस्तानशी संबंध तोडले पाहिजे. कठोर कारवाई आवश्यक आहे. दरवर्षी अशा गोष्टी घडतात हा विनोद नाही. दहशतवाद सहन केला जाऊ शकत नाही."
#pahalgamterroristattack वर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मी भारताच्या खूप जवळ आहे आणि मी पाकिस्तानच्याही खूप जवळ आहे आणि ते एक हजार वर्षांपासून काश्मीरसाठी लढत आहेत. काश्मीरचा प्रश्न एक हजार वर्षांपासून सुरू आहे, कदाचित त्याहूनही जास्त. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला अत्यंत वाईट हल्ला होता. त्या सीमेवर १,५०० वर्षांपासून तणाव आहे. तो असाच आहे पण मला खात्री आहे की हा वाद दोन्ही देश कसा तरी सोडवतील. मी दोन्ही देशांच्या नेत्यांना ओळखतो. पाकिस्तान आणि भारतामध्ये खूप तणाव आहे, पण तो नेहमीच असतो."
Phule Collection: ‘फुले’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची आकडेवारी आली समोर
Entertainment Live News Today, 26 April 2025 : प्रदर्शनापूर्वीच वादात अडकलेला ‘फुले’ चित्रपट अखेर शुक्रवारी २५ एप्रिलला रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, त्याची आकडेवारी समोर आली आहे. वाचा सविस्तर
Shopian, Jammu and Kashmir : दहशतवाद्यांशी संबंधित छोटीपोरा येथील एका जमिनदोस्त केलेल्या घराचे दृश्य
Shopian, Jammu and Kashmir : दहशतवाद्यांशी संबंधित छोटीपोरा येथील एका जमिनदोस्त केलेल्या घराचे दृश्य
जे काही घडले ते अत्यंत चुकीचे”म्हणत पाकिस्तानी नागरिकाने सोडला भारत
जे काही घडले ते खूप चुकीचे होते... ज्याने हे केले त्याला शिक्षा झाली पाहिजे..." असे एका भारतीय नागरिकाने म्हटले आहे जो आपल्या नातेवाईकाला पाकिस्तानात सोडण्यासाठी अटारी सीमेवर पोहोचला होता.
पंजाबमधील अमृतसर येथील अटारी येथे भारत सोडताना पाकिस्तानी नागरिक
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने अटारी एकात्मिक चेकपोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वैध मान्यता घेऊन सीमा ओलांडलेले (पाकिस्तानी नागरिक) १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत जाऊ शकतात.
पाकिस्तानात काहीही घडू शकते! चोर आला, ठाण्यात घुसला, पोलिसांबरोबर बोलला अन् केलं असं की लगेच ठाण्यात गोंधळ उडाला, घडलं काय?
Police Station in Pakistan Shocking Incident Goes Viral: भारताचा शेजारी देश पाकिस्तान बऱ्याचंदा आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत येतो. बऱ्याचंदा तिथले लोकं असं काही करतात की ज्यामुळे पाकिस्तानची खिल्ली उडवली जाते. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. सध्या पाकिस्तानातील एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे वाचल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. सविस्तर वाचा
पहलगाममधून दहशतवादी हल्ल्याचा भयानक VIDEO समोर; क्षणातच धडाधड गोळ्या अन्…पर्यटकासमोरच सर्व काही सेकंदात घडलं
CSK vs SRH: मोहम्मद शमीने घडवला इतिहास, IPLमध्ये ‘ही’ अनोखी कामगिरी चार वेळा करणारा एकमेव गोलंदाज
IPL 2025 Mohammed Shami Unique Record: चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर सनरायझर्स हैदराबादविरूद्ध सामना खेळवला जात आहे. मोहम्मद शमीने या सामन्यात खेळताना अनोखी कामगिरी केली आहे. शमीने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेत इतिहास घडवला. पण शमीने पुढच्याच चेंडूवर नो बॉल टाकला. पण या अनोख्या नो बॉलनेही सर्वांचं लक्ष वेधलं.
Petrol And Diesel Price In Maharashtra: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज २६ एप्रिल २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय? वाचा सविस्तर
Gold-Silver Price: आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात घसरण, पाहा १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?
old-Silver Price Today: सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज शनिवारी सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…वाचा सविस्तर
Pahalgam Terror Attack Live Updates: अतिरेकी हल्ल्यानंतर तीन दहशतवाद्यांच्या घरावर कारवाई; पुलवामा, कुलगाम आणि शोपियाँ जिल्ह्यातील घरे जमीनदोस्त
दहशतवाद्यांशी संबंधित असलेल्या तीन जणांची घरे जमीनदोस्त केल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. पुलवामा, कुलगाम आणि शोपियाँ या जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. सविस्तर वाचा