Pahalgam Terror Attack Kashmir Local Woman video: जम्मू काश्मीरमधील पेहेलगाम ठिकाणी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी दहशवादी हल्ला करण्यात आला. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतासह संपूर्ण जगात संतापाची लाट उसळली आहे. अनेक देशांच्या प्रमुखांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच जगभरात पसरलेले भारतीय नागरिक त्या त्या ठिकाणी हल्ल्याच्या विरोधात निषेध नोंदवत आहेत. यातच आता काश्मीरमधील आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो तेथील एका स्थानिक महिलेचा आहे. व्हिडिओमध्ये महिलेने एक धक्कादायक दावा केला आहे जो पाहून सर्वचजण आवाक् झाले. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

काश्मीरमधील एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काश्मीरमधील बहुतेक मुस्लिम मनापासून पाकिस्तानला आपले मानतात असा दावा करण्यात आला आहे. ज्यामुळे आता हा व्हिडिओ वेगाने चर्चेचा विषय बनत आहे. ती महिला म्हणते की ती भारतात राहत असली तरी पाकिस्तान तिच्या हृदयात राहतो. ती म्हणाले की, काश्मीरमधील लोक पाकिस्तानी लोकांना त्यांचे खरे भाऊ आणि बहिणी मानतात आणि तिथेच त्यांना आपलेपणाची भावना जाणवते.

यावर एक पुरूष महिलेला विचारताना दिसतो की काश्मीरचे लोक भारताला स्वतःचे मानतात की पाकिस्तानला? यावर उत्तर देताना त्या महिलेने सांगितले की पाकिस्तान तिच्या हृदयात राहतो. काश्मीरमध्ये राहणाऱ्या बहुतेक मुस्लिमांच्या हृदयात पाकिस्तान आहे. जेव्हा त्या महिलेला विचारण्यात आले की ती भारतात राहते, तेव्हा तिने सांगितले की हिंदू आणि मुस्लिम हे भाऊ आहेत पण पाकिस्तानातील मुस्लिम तिचे खरे भाऊ आहेत. ती मनापासून फक्त पाकिस्तानलाच आपले मानते. या व्हिडीओवर आता नेटकरी नाराजी व्यक्त करत टीका करत आहेत.

पाहा व्हिडीओ

वाचलेल्या पर्यटकांनी सांगितली आपबिती!

या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी तपास पथकाला घडलेला प्रकार सांगितला. “तिथे चार माणसं लष्कराच्या वेषात आली. बाजूच्या घनदाट जंगलातून ते बाहेर आले. त्यांनी आल्यावर आमची नावं विचारली. आम्हाला वाटलं ते सुरक्षा अधिकारी आहेत. पण अचानक त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांनी पुरुषांना प्रामुख्याने लक्ष्य केलं होतं. महिलांना त्यांनी सोडून दिलं होतं. काही पुरुषांना तर त्यांनी अगदी जवळून गोळ्या घातल्या”, असं एका महिला पर्यटकानं सांगितल्याचं तपास अधिकाऱ्यांनी नमूद केलं.

Live Updates